'बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पसार', गिरीश बापट यांचा शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 01:20 PM2020-01-04T13:20:43+5:302020-01-04T13:30:48+5:30

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे.

bjp girish bapat reaction on abdul sattar resign | 'बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पसार', गिरीश बापट यांचा शिवसेनेला टोला

'बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पसार', गिरीश बापट यांचा शिवसेनेला टोला

Next
ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. गिरीश बापट यांनी सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळून गेला असं म्हणत बापट यांनी शिवसेनेला टोला लगावला.

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती.  मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचे गिरीश बापट यांनी सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळून गेला असं म्हणत बापट यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

'सरकारने अद्याप खातेवाटप केलेले नाही. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा का दिला हे माहीत नाही. मी अशी कोणतीही बातमी ऐकलेली नाही. लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळून गेला अशी परिस्थिती उद्भवली आहे' असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिवसभरात अशा बऱ्याच बातम्या येतील, असे म्हटले आहे. तर, भाजपा नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनीही, महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं उघड झाल्याचं म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले. तर औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज झाले. अखेर आज त्यांनी खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.  

दरम्यान,  सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून, खोतकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर याचवेळी खोतकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे सत्तार यांच्यासोबत फोनवरून बोलणं करून दिले असल्याची ही बोलले जात आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेला पहिला धक्का

आज अशा बऱ्याच बातम्या मिळतील; अब्दुल सत्तार राजीनाम्यानंतर चंद्रकांतदादांचा चिमटा

अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... 

 

Web Title: bjp girish bapat reaction on abdul sattar resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.