शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकनाथ खडसे आणि तावडेंची खलबतं, बंडखोरीवर म्हणतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 16:25 IST

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपांतर्गत नेतृत्वाविषयी असलेली नाराजी समोर येऊ लागली आहे.

मुंबईः राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपांतर्गत नेतृत्वाविषयी असलेली नाराजी समोर येऊ लागली आहे. निवडणुकीच्या काळात भाजपानं एकनाथ खडसेंना जाणूनबुजून बाजूला ठेवले. तिकीट न मिळाल्यानं विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मनात डावलल्याची भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अशा नेत्यांनी भाजपांतर्गत दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंची बैठक झाली आहे. त्या बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे.बैठकीत काय चर्चा झाली असे पत्रकारांनी विचारले असता खडसे म्हणाले, पारिवारिक चर्चा झाली. आमच्याकडे एक कार्यक्रम आहे. परिवारातल्या सदस्यांना आमंत्रण द्यायला बोलावलं होतं. तसेच भाजपासमोर काहीही आव्हानं नसल्याचाही त्यांनी खुलासा केला आहे. भाजपासमोर काहीही आव्हान नाही, भाजपा पक्ष सध्या तरी एकसंध आहे. पक्षामध्ये एकजूट आहे आणि योग्य वेळी तुम्हाला दिसून येईल. जस जशा निवडणुका येतील, त्या त्या वेळी योग्य काय ते दिसून येईल. पंकजाताईंची काही भेट घेतलेली नाही. पंकजाताईंची भेट घेण्याची काही आवश्यकता नाही. गोपीनाथ गडावर दरवर्षी जातो आणि आताही जाणार आहे. या वर्षीसुद्धा जाणार आहे. सध्या तरी वेगवेगळे मतप्रवाह समोर आलेले नाहीत. मीडियाच्या माध्यमातून बरीचशी माहिती समजल्याचाला टोलाही खडसेंनी लगावला आहे. तर विनोद तावडेंनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, कालच भाजपाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा डाव आखला. गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव भाजपाने केला होता. पण, आम्ही त्याला विरोध केल्याने तो ठराव फेटाळून लावला असं त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडेंच्या मनात खदखद होती, ती खदखद त्यांनी उघडपणे बोलून दाखवली नाही. पण वर्तमानपत्रातील नाराजीच्या बातम्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या काळात शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी माझी दोनवेळा भेट घेतली.पण त्यांनी मला शिवसेनेत येण्याचा कुठलाही प्रस्ताव दिला नाही. गेल्या 22 वर्षांची आमची युती आहे, मी 2009 साली नाराज झालो होतो, तेव्हाही माझी नाराजी दूर करून तुम्ही भाजपातच राहिलं पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी मला सांगितल्याचं गोपीनाथ मुंडेंनी स्पष्ट केलं होतं. भाजपा-शिवसेना आणि रिपाइं ही युती घडविण्यात तुमची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पण माझ्याच पक्षातील काही लोकं मी शिवसेनेत-काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवत होते, असेही मुंडेंनी त्यावेळी सांगितले होते. तर, गोपीनाथ मुंडे हे तत्कालीन काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे जवळचे मित्र असल्याने ते काँग्रेसमध्येही जाणार अशा चर्चा होत्या.   

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019