शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:28 IST

BJP District President List: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध जिल्ह्यांमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या करण्यात आल्या असून, अनेक नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी देण्यात आली आहे. पक्षाच्या आगामी रणनीतीचा भाग म्हणून या बदलांना विशेष महत्त्व दिले जात आहे.

सातारा जिल्ह्यातील विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्याऐवजी आता अतुल भोसले यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा बदल साताऱ्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकतो. पुणे जिल्ह्यामध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. धीरज घाटे यांचे नाव कायम ठेवण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यपद्धतीवर पक्षाचे समाधान असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, मावळमध्ये प्रदीप कंद यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला असून, त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मावळमधील भाजपची पकड अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या संघटनात्मक बदलांमुळे भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत असून, नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची यादीप्रभाकर सावंत - सिंधुदुर्गसतिष मोरे - रत्नागिरी उत्तरराजेश सावंत - रत्नागिरी दक्षिणअविनाश कोळी - रायगड उत्तरधैर्यशील पाटील - रायगड दक्षिणसंदिप लेले - ठाणे शहरजितेंद्र डाकी - ठाणे ग्रामीणरविकांत सावंत - भिवंडीदिलीप जैन - मिरा भाईंदरराजेश पाटील - नवी मुंबईनंदु परब - कल्याणराजेश वधारिया - उल्हासनगरधिरज घाटे - पुणे शहरप्रदिप कंद - पुणे उत्तर (मावळ)शत्रुघ्न काटे - पिंपरी चिंचवड शहररोहिणी तडवळकर - सोलापूर शहरशशिकांत चव्हाण - सोलापूर पूर्वचेतनसिंग केदार - सोलापूर पश्चिमअतुल भोसले - साताराराजवर्धन निंबाळकर - कोल्हापूर पूर्व (हातकणंगले)नाथाजी पाटील - कोल्हापूर पश्चिम (करवीर)प्रकाश ढंग - सांगली शहरसम्राट महाडिक - सांगली ग्रामीणनिलेश माळी - नंदुरबारगजेंद्र अंपाळकर - धुळे शहरबापु खलाने - धुळे ग्रामीणनिलेश कचवे - मालेगांवदिपक सुर्यवंशी - जळगांव शहरचंद्रकांत बाविस्कर - जळगावं पूर्वराध्येश्याम चौधरी - जळगावं पश्चिमनितीन दिनकर - अहिल्यानगर उत्तरदिलीप भालसिंग - अहिल्यानगर दक्षिणअमर राजूरकर - नांदेड महानगरशिवाजी भरोसे - परभणी महानगरगजानन घुगे - हिंगोलीभास्करराव मुकुंदराव दानवे - जालना महानगरनारायण कुचे - जालना ग्रामीणसुभाष शिरसाठ - छत्रपती संभाजीनगर उत्तरसंजय खंबायते - छत्रपती संभाजीनगर पश्चिमदत्ता कुलकर्णी - धाराशिवविजयराज शिंदे - बुलढाणासचिन देशमुख - खामगांवजयवंतराव मसणे - अकोला महानगरसंतोष शिवरकर - अकोला ग्रामीणपुरुषोत्तम चितलांगे - वाशिमडॉ. नितीन धांडे - अमरावती शहररविराज देशमुख - अमरावती ग्रामीण (मोरणी)प्रफुल्ल चव्हाण - यवतमाळडॉ. आरती फुफाटे - पुसदप्रभुदास भिलावेकर - मेळघाटदयाशंकर तिवारी - नागपूर महानगरअनंतराव राऊत - नागपूर ग्रामीण (रामटेक)मनोहर कुंभारे - नागपूर ग्रामीण (काटोल)आशु गोंडाने - भंडारासिता रहांगडाले - गोंदियादिपक बाळा तावडे - उत्तर मुंबईदिपक दळवी - उत्तर पूर्व मुंबईविरेंद्र म्हात्रे - उत्तर मध्य मुंबई 

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024