शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने ठरविले, मित्रांची प्रतीक्षाच; विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 06:01 IST

भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी विधानसभा अध्यक्षांना सोमवारी पत्र दिले, त्यात ११ अध्यक्षांची नावे दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधिमंडळाचे कामकाज अधिक परिणामकारक होण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे भाजपने निश्चित केली. मित्रपक्ष शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या वाट्याला आलेली अध्यक्षपदे कोणाला मिळणार, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. 

भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी विधानसभा अध्यक्षांना सोमवारी पत्र दिले, त्यात ११ अध्यक्षांची नावे दिली. तीन पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणत्या समित्यांचे अध्यक्षपद मिळणार, हे निश्चित करण्यात आले होते. विधानभवनाच्या सूत्रांनुसार, भाजपने आमच्याकडे नावे पाठविलेली आहेत. अन्य पक्षांकडून नावे आली, की एकत्रित नियुक्ती जाहीर करण्यात येईल. आम्ही आमची नावे लवकरच पाठवू, असे अजित पवार गटाच्या नेत्यांनी सांगितले. 

विधानमंडळ समित्यांचे अध्यक्षसमितीचे नाव    अध्यक्षांचे नावसार्वजनिक उपक्रम समिती    राहुल कूलपंचायत राज समिती    संतोष दानवे अनुसूचित कल्याण समिती    नारायण कुचे अनुसूचित जमाती कल्याण समिती    राजेश पाडवीमहिलांचे हक्क व कल्याण समिती    मोनिका राजळेइतर मागासवर्ग कल्याण समिती    किसन कथोरेमराठी भाषा समिती    अतुल भातखळकरविशेष हक्क समिती    राम कदमधर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी समिती    नमिता मुंदडाआमदार निवास व्यवस्था     सचिन कल्याणशेट्टीआश्वासन समिती    रवी राणा

कुणाला मिळते अध्यक्षपद?मंत्रिपद न मिळालेल्यांना समित्यांचे अध्यक्षपद दिले जाते असा अनुभव आहे. भाजपची यादी पाहताना त्याची प्रचीती येते. लोकलेखा समिती ही अशी एकमेव समिती आहे की जिचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिले जाते. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. विधानसभेत विरोधी पक्षनेताही अद्याप ठरलेला नाही. अशात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस