भाजपा नगरसेविकेचा पती गजाआड

By Admin | Updated: June 27, 2017 01:43 IST2017-06-27T01:43:01+5:302017-06-27T01:43:01+5:30

पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीला निगडी पोलिसांनी अटक केली.

BJP corporator's husband GazaAad | भाजपा नगरसेविकेचा पती गजाआड

भाजपा नगरसेविकेचा पती गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीला निगडी पोलिसांनी
अटक केली. अनिल उर्फ बापू अभिमान घोलप असे त्याचे नाव असून तो प्रभाग क्रमांक १३ च्या भाजपाच्या नगरसेविका कमल यांचा पती आहे.निगडी ओटास्किम येथील रहिवासी अनिल घोलप (४०) हा आरोपी राजू नामदेव रिठे (२२) या कार्यकर्त्यासोबत रविवारी रात्री बाराच्या सुमारास यमुनानगर पोलीस चौकीत आला. माझ्या वॉर्डातील लोकांची फिर्याद का दाखल करून घेत नाही,
असे म्हणून तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला.
पोलीस हवालदार आठवले यांना त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की केली. मदतीसाठी आलेल्या पोलिसांनाही त्याने शिवीगाळ
करीत धमकाविले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घोलप याला अटक केली आहे.

Web Title: BJP corporator's husband GazaAad