शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट; पक्ष संपल्यापासून मानसिक संतुलन बिघडलंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:14 IST

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तसेच भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपाचे हिंदुत्व दुतोंडी असल्याचा आरोपही केला. आगामी काळात सत्तेसाठी चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील, मंदिराच्या कार्यक्रमाला लोकांना नेऊन दंगली घडवतील, असे भाजपाचेच सत्यपाल मलिक व खा. महुआ मोईत्रा यांनी म्हटले. निवडणुकांसाठीच पुलवामा घडला होता, तेव्हा सावध राहा, असं उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील सभेत म्हटलं आहे. यावरून आता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट. तुमचा पक्ष संपल्यापासून तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय… काळजी घ्या उद्धवजी" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "उद्धवजी आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदी जी यांच्यावर आहे. कारण नरेंद्र मोदीजी रात्रं दिवस काम करताहेत. म्हणूनच तुमचा जळफळाट.. थयथयाट सुरू आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट. उद्धव जी, तुम्हाला नेमका कशाचा राग आहे, जम्मू काश्मीरचं कलम ३७० हटवल्याचा राग आहे की अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहतंय याचा राग आहे. आपली आता अर्थव्यवस्था मजबूत बनतेय याचा राग आहे की आपण चंद्रावर पोहोचलो याचा राग आहे. भारताची किर्ती जगभरात पोहोचलीय याचा राग आहे. उद्धवजी आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदी जी यांच्यावर आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रात्रं दिवस काम करताहेत. म्हणूनच तुमचा जळफळाट... थयथयाट सुरू आहे."

"उद्धवजी मी मागील वेळेस तुमच्या जळजळीवर बरनोल पाठवलं होतं पण आता कळतंय की त्याचा काही उपयोग नाही. कारण तुमची जळजळ ही मानसिक आहे.  तुमचा पक्ष संपल्यापासून तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय…. काळजी घ्या उद्धवजी" असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी देखील उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 

"सर्वस्व गेलेल्या, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न..."; उद्धव ठाकरेंना टोला

"सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न नेत्याचे हे उदगार आहेत! उद्धवजी, आपले सर्वस्व संपले आहे, हे आपणच मान्य करून टाकलं, हे एक बरं झालं! मतदार विचारत नाहीत, साथीदार साथ देत नाहीत अशा अवस्थेत तुमचा तोल ढळला आहे. एखाद्या मानसोपचारतज्ञाची तुम्हाला मदत घ्यावी लागेल असे वाटते. बघा तुमच्याकडे कोणी मिळते का?" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाPoliticsराजकारण