शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh : "कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 13:20 IST

BJP Chitra Wagh : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी 28 विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत हजर झाले आहेत. या बैठकीत जागावाटपासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत असून, यासाठी हॉटेलमध्ये सुमारे 200 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरून भाजपाने हल्लाबोल केला आहे. "पोटात एक अन् ओठात एक, कसले पुरोगामी नि कसले डावे, खुर्चीसाठी ज्यांचा प्राण तळमळे, अशा घोटाळेबाजांना काय म्हणावे?" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"इथं कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण, हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर देखील घणाघात केला आहे. ."#घमंडिया_आघाडी पंतप्रधान मोदीजी विरोधात लढायला निघाले आहेत पण त्यांचा सेनापतीच अजून ठरत नाहीये.." असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

"#घमंडिया आघाडीचा खेळ भरलाय न्यारासंधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा

इथं कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळपण, हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ 

पोटात एक अन् ओठात एक, कसले पुरोगामी नि कसले डावेखुर्चीसाठी ज्यांचा प्राण तळमळेअशा घोटाळेबाजांना काय म्हणावे?

जनतेच्या ऊरावर बसलीत केव्हापासून ही भ्रष्ट घराणीपाप धुण्याही कमीच पडेलह्या अरबी समुद्राचे पाणी..." असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"#घमंडिया_आघाडी पंतप्रधान मोदीजी विरोधात लढायला निघाले आहेत पण त्यांचा सेनापतीच अजून ठरत नाहीये.. राहुल गांधीचं नाव घेतलं की ममता बॅनर्जी नाराज होते.. केजरीवालचे नाव घेतले की राहुल गांधी नाराज होतात… ममता बॅनर्जीचं नाव घेतलं की नितीश कुमार नाराज होतात... नितीश कुमारांचं नाव घेतलं की उद्धव ठाकरे नाराज होतात.... आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की सगळेच नाराज होतात."

"या ठगबंधनात उद्धव ठाकरे हे संपलेल्या पक्षाचे नेते आहेत. ओसाड गावचे पाटील म्हणून उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित आहेत. पण त्यांच्यावर कोणाचाही विश्वास नाहीए. आत्मविश्वास गमावलेले विरोधक एकत्र आले आहेत. त्यांना विश्वास आहे की मोदींना विरोध केला तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. यातून कळतंय की घमंडिया आघाडी आतून किती पोकळ आहे" असं देखील चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाMahabharatमहाभारतINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी