शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धवजी, तुम्ही राजीनामा दिला तेव्हाच मविआचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 16:27 IST

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्युशन लावा, असा खोचक सल्ला भाजपकडून देण्यात आला आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता महाविकास आघाडी तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता ठाकरे गटाने केलेल्या टीकेवर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

आता खर्‍या अर्थाने लढा सुरू झाल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आला आहे. आपला लढा जनतेसाठी आहे. हा लढा देश आणि राज्यासाठी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायलायाने लक्तरे टांगल्यानंतर नैतिकतेला धरून शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा. तुम्हाला जीवदान मिळाले असेल तर ते तात्पुरते आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवला, तो मेलेला आहे, हालचाल नाही, परंतु तो मृत घोषित असल्याचे काम विधानसभा अध्यक्षांना दिले आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. 

उद्धवजी, तुम्ही राजीनामा दिला तेव्हाच मविआचा पोपट मेला

उद्धव जी ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला. सुप्रीम कोर्टानं पण तेच सांगितलं. तुम्हाला कायद्याची भाषा समजत नसेल तर आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्युशन लावा, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. तसेच ज्यांची पक्ष प्रमुख पदाची नियुक्ती केंद्रीय निवडणूक आयोगानं बेकायदा ठरवली तेच ज्ञान पाजळताहेत की राज्यपाल नियुक्तीवर नियमावली आणावी. उद्धवा, अजब तुझा कारभार !, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली. 

दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता. महाविकास आघाडीने लगेच नवीन अध्यक्ष बनवायला पाहिजे होते. असे झाले असते तर १६ आमदार अपात्र ठरले असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले होते. यावर बोलताना, सरकार पडण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा कांगावा करणाऱ्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलावे. नाना पटोले, उद्धव ठाकरे आता तुमचे कान सोनाराने (अजित पवार) टोचले, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUddhav Thackerayउद्धव ठाकरेChitra Waghचित्रा वाघ