शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना ही ‘लव्ह जिहाद’ची बळी; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:17 IST

महाराष्ट्रात काही दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत व आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं होते त्यावर भाजपाने पलटवार केला आहे.

मुंबई - महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे आणि या लव्ह जिहादला उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना स्वत:हून पडलेली बळी आहे अशा शब्दात प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक टोला लगावला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजपावर होत असलेल्या टीकेवर उपाध्ये यांनी पलटवार केला आहे. 

मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फरफटत जाणे यालाच लव्ह जिहादचा बळी म्हणतात. त्यामुळेच संजय राऊत आणि शिल्लक सेनेतील नेत्यांना सगळीकडे भगव्याऐवजी हिरवं हिरवं छान वाटायला लागले आहे. शिल्लक सेना स्वतःचं किती अधःपतन करुन घेणार आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

त्याचसोबत तुम्ही ज्यांच्यासोबत बसलाय, अबु आझमी जे महाविकास आघाडीत आहेत. त्यांना औरंग्या प्रिय होता त्यांच्याबद्दल तुम्ही अवाक्षर काढत नाही. त्याऐवजी संजय राऊत महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारवर टीका करत आहात. त्यामुळे लव्ह जिहादचा बळी तुम्हीच आहात अशी टीका केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर केली आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत?औरंग्यास जिवंत केल्याशिवाय भाजप-मिंधे सरकारच्या मुडद्यात जान फुंकली जाणार नाही. महाराष्ट्रात काही दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत व आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत. गाडलेल्या मुडद्यांमुळे हिंदुत्व धोक्यात यावे इतके ते कच्चे व लेचेपेचे नाही. लेचेपेचे आहे ते भाजपचे व मिंध्यांचे राजकारण. महाराष्ट्रातील इतर प्रश्नांवरचे लक्ष विचलित करण्यासाठीच औरंगजेबाचा मुडदा उकरला जात आहे. सरकार अपात्र ठरत आहे, ते कोसळणार आहे. त्यामुळे बुडत्यास काडीचा आधार तसा या बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच म्हणावे लागेल असं राऊतांनी म्हटलं होते. 

टॅग्स :BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत