शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हीच ती वेळ! 'शिवसेना-काल, आज आणि उद्या' पुस्तकातील संदर्भाचा दाखला देत भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 10:55 IST

मनोहर जोशी यांनी शिवसेनेचा भूतकाळ विस्ताराने लिहिला, पण भविष्यकाळावर भाष्य करणे मात्र टाळले असं भाजपाने सांगितले.

मुंबई - ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आणि भाजपात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री आहेत असा हल्ला केल्यानंतर आता भाजपा नेतेही चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरे यांना पुन्हा अशी भाषा वापरली तर घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर आता भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना-काल, आज आणि उद्या या पुस्तकातील संदर्भ देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

केशव उपाध्ये यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, “स्वार्थप्रिय व आत्मकेंद्रित लोकांना ध्येयवाद उच्चारण्याचा अधिकार नसतो. ध्येयाचा धागा हातून सुटलेल्यां पतंगाचे भाकित कोण सांगू शकेल?”- प्राचार्य राम शेवाळकर (पान ९३७), “बाळासाहेबांच्या पश्चात त्यांची स्मृती जोपर्यंत जनमानसात प्रभावी असेल तोपर्यंतच उद्धवची प्रतिमा लोकप्रिय राहील व नंतर ती उतरणीस लागेल!”- ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता ताम्हाणे (पान ९४३), बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या चार दशकांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘शिवसेनाः काल, आज, उद्या’ या शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या शोधनिबंधात वर्तविली गेलेली ही भाकिते आहेत. 

तसेच मनोहर जोशी यांनी शिवसेनेचा भूतकाळ विस्ताराने लिहिला, पण भविष्यकाळावर भाष्य करणे मात्र टाळले. ते काम त्यांनी समाजातील काही मान्यवरांवर सोपविले. प्राचार्य राम शेवाळकर आणि स्वातंत्र्यसैनिक दत्ता ताम्हाणे यांनी वर्तविलेले भविष्य आज खरे ठरताना दिसत आहे. किंबहुना, आजची उद्धव ठाकरेंची स्थिती पाहता, तेव्हा वर्तविलेले भविष्य वास्तवात येण्याची ‘हीच ती वेळ’ असेच म्हणावे लागेल असा टोलाही केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

'फडतूस गृहमंत्री' या शब्दावरून रणकंदनठाण्यात शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे नावाच्या युवती पदाधिकारीला मारहाण करण्यात आली. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टवरून हे प्रकरण पुढे आले. या महिलेवर सध्या ठाण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमी महिलेला भेटण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे गेल्या होत्या. महिलेच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात फडतूस गृहमंत्री असून लाळघोटेपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केला. त्याचसोबत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या भाषेवरून भाजपा नेतेही आक्रमक झाले. फडणवीस फडतूस नाही तर काडतूस आहे असा पलटवार भाजपाने केला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस