शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
3
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
4
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
5
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
6
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
7
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
8
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
9
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
10
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
11
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
12
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
13
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
14
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
15
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
16
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
19
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता

ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:40 IST

उबाठाची अरेरावी अनेकवेळा सहन करीत, सन्मान, आदर देऊनही भाजपासोबत विश्वासघात करून  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपालाच धोका दिला.

मुंबई - भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय कलगीतुरा कायम पाहायला मिळतो. महाविकास आघाडी बनवत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले, तेव्हापासून भाजपा आणि ठाकरे यांच्यातील संबंध दुरावत गेले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उदाहरण देत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. ते ट्रम्प आणि हे पिपाण्या..एवढाच काय तो फरक अशा शब्दात उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना हिणवलं आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, आपण भारत व रशियाला चीनच्या हाती सोपविले’ अशा आशयाचे हताश उद्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोल्डान्ड ट्रम्प यांनी काढले. चांगले मित्र गमावणे हा विश्वासघात, अरेरावी व मुजोरीचा अंतिम टप्पा असतोच. आमच्या महाराष्ट्रातसुध्दा याच गुणांमुळे उद्धवराव व शरद पवार हेच वाक्य म्हणत आहेत, फक्त भारत व रशियाऐवजी वेगळे शब्द आहेत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच उबाठाची अरेरावी अनेकवेळा सहन करीत, सन्मान, आदर देऊनही भाजपासोबत विश्वासघात करून  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपालाच धोका दिला. आता सगळेच गमावून कॅाग्रेसचे अंकित होऊन बसले. भाजपाच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ला असणारा मान आता गेला. आता राहुल गांधीच्या मातोश्रीचा मान राखायला उद्धव ठाकरे दिल्लीला जातात असा टोलाही भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

भाजपा आणि ठाकरेंमध्ये दुरावा का?

२०१९ पर्यंत राज्यातील राजकारणात भाजपा आणि शिवसेना यांच्यात युतीचं नाते होते. २०१९ ची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्रित लढवली. परंतु निकालाचे चित्र स्पष्ट झाले तेव्हा मुख्यमंत्रि‍पदावरून भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला. भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी बनवली आणि राज्यात मुख्यमंत्रिपद मिळवले. उद्धव ठाकरे यांच्या या खेळीने सर्वाधिक जागा जिंकूनही भारतीय जनता पार्टीला विरोधी बाकांवर बसावे लागले. युती तुटली, सत्ता गेली त्यामुळे विरोधात असणाऱ्या भाजपाने आक्रमकपणे मविआ सरकारला टार्गेट केले. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडखोरीच्या भूमिकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि पुन्हा भाजपाच्या नेतृत्वात सरकार आले. परंतु २०१९ पासून भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढतच गेला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार