शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Atul Bhatkhalkar : "महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प अन्यत्र गेले अशी बोंब मारणाऱ्या रिकाम टेकड्या घरबशांसाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 10:58 IST

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. खोचक टोला लगावला आहे.  

लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात जागतिक पातळीवरील सुसज्ज अशी ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती होईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया झाली असून नोव्हेंबरपासून  निर्मिती सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी केली. अश्विनी वैष्णव म्हणाले, प्रारंभी महिन्यात तीन रेल्वे, त्यानंतर पाच रेल्वे, अशा टप्प्याटप्प्याने  निर्मिती वाढविली जाईल. ‘वंदे भारत’ रेल्वे सध्या चेअर कार आहे. पुढे स्लीपर रेल्वेचीही निर्मिती केली जाईल, मराठवाड्यात जो भाग जोडलेला नाही, त्यांना ‘गती शक्ती’ योजनेंतर्गत जोडले जाईल. मराठवाड्यासाठी आवश्यक रेल्वे प्रकल्प देण्यासाठी वचनबद्ध आहे. याच दरम्यान भाजपाने यावरून शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. 

"कोरोना काळात जेव्हा जनाब मुख्यमंत्री घरी बसलेले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते याची झलक पाहा" असं म्हणत भाजपाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Shivsena Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे. तसेच "महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प अन्यत्र गेले अशी बोंब मारणाऱ्या रिकाम टेकड्या घरबशांसाठी..." असं म्हणत बोचरी टीका केली आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"कोविड महामारीच्या काळात जेव्हा जनाब मुख्यमंत्री घरी बसले होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते याची झलक पाहा. अवघ्या तीन वर्षापूर्वी लातूर मध्ये रेल्वे बोगीच्या कारखान्याची घोषणा झाली. तो कार्यरत ही झाला. नोव्हेंबरपासून इथे वंदे भारत एक्स्प्रेसच्या बोगी बनवणार येणार आहेत" असं म्हटलं आहे. 

भाजपाच्या अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प अन्यत्र गेले अशी बोंब मारणाऱ्या रिकाम टेकड्या घरबशांसाठी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हा रेल्वे कारखाना म्हणजे पोटात मुरडा आणणारी बाब आहे" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. भातखळकर यांनी याआधी देखील विविध मुद्यांवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. 

 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना