शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

"अडीच वर्षाचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह"; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 19:59 IST

BJP Atul Bhatkhalkar And Uddhav Thackeray : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. हिंदुत्वाच्या मुद्दयावरून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सरकार करावं अशी मागणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होता. पण माझ्या लोकांनाच मी नको. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे माझ्याशी चर्चा करायला हवी होती. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो. उगाच का असं करताय? मी राजीनामा तयार करून ठेवला. या आणि राजभवनात पत्र घेऊन जा, सत्तेसाठी मी लाचार नाही असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले. यानंतर आता भाजपाने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हवर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. "अडीच वर्षाचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "पांचट कोट्यांचा शिल्लक कोटा पूर्ण करतायत बहुधा…" असं ट्विट हे उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच त्यांनी केलं. त्यानंतर फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर "अडीच वर्षाचा प्रवास… फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह" असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. "समोर येऊन राजीनामा मागा, हे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवर सांगतायत" असं देखील म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी "या समोर बसा, मी देतो राजीनामा. जे आमदार गायब आहेत त्यांनी माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनात जावं कारण मला कोरोना झाला आहे" असं म्हटलं आहे. "एकदा ठरवूया, तुम्ही या किंवा तिथून फोन करा आणि सांगा तुमचं आम्ही फेसबुक लाईव्ह पाहिलं. आम्हाला यायला संकोच वाटतो पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नकोत हे स्पष्ट सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे" असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना