शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवारांना अकार्यक्षम, रबर स्टॅम्प मुख्यमंत्री हवा होता, ती गरज सरली... आता फाटाफूट होणारच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 09:48 IST

BJP Atul Bhatkhalkar And NCP Sharad Pawar : सत्तांतरानंतरच्या ३६ दिवसांत त्यांच्यात ३६ चा आकडा तयार झालेला दिसत आहे. इतक्या अल्पावधीत हा बदल होईल, असे वाटले नव्हते. यावरून आता भाजपाने महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.

मुंबई - सध्या महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये परस्परांना सोडचिठ्ठी देण्याची स्थिती दिसत आहे. २९ जूनपर्यंत हे तीन पक्ष एकत्रितपणे सत्तेत होते, पुढची पंचवीस वर्षे आम्हीच राहू, असं सांगत होते, आणाभाका घेत होते अन् आज सत्तांतरानंतरच्या ३६ दिवसांत त्यांच्यात ३६ चा आकडा तयार झालेला दिसत आहे. इतक्या अल्पावधीत हा बदल होईल, असे वाटले नव्हते. यावरून आता भाजपाने महाविकास आघाडीला  खोचक टोला लगावला आहे. तसेच शरद पवारांवरही (NCP Sharad Pawar) जोरदार निशाणा साधला आहे. 

"शरद पवारांना अकार्यक्षम, रबर स्टॅम्प मुख्यमंत्री हवा होता, ती गरज सरली... आता फाटाफूट होणारच" असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पवारांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी हवे होते ते काही प्रेमापोटी नव्हे. त्यांना अननुभवी, अकार्यक्षम आणि रबर स्टॅम्प मुख्यमंत्री हवा होता. ती गरज सरली, त्यामुळे आता फाटाफूट होणारच" असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी असो की ओबीसी आरक्षणाची; राष्ट्रवादीचे नेते हे शिवसेना किंवा काँग्रेसच्या नेत्यांना सोबत न घेता एकटेच राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. तीन पक्षांची एकही संयुक्त पत्रपरिषद होताना दिसत नाही. अतिवृष्टीग्रस्त भागाचे दौरे राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे नेते वेगवेगळे करीत आहेत. ठाकरेंची शिवसेना स्वत:लाच सावरण्यात गुंतली आहे. शत्रूंना निपटवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे कुठे? सध्या त्यांचा आपल्यांशीच झगडा सुरू आहे. वाघाचीच शिकार चालू आहे. उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे हे पितापुत्र  पक्ष वाचविण्यासाठी कसरत करत आहेत. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद, एकमेकांबद्दलचे संशयाचे वातावरण वाढले आहे. नाना पटोले व्हिडिओ बॉम्ब अंगावर पडतापडता वाचले. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांना, आमदारांना भाजपचे वेध लागले आहेत. 

३६ दिवसांत­­ मविआत ३६ चा आकडा; गडबडीत राष्ट्रवादीने शिवसेनेचे बोट सोडले 

शिवसेनेची तोफ संजय राऊत सध्या कोठडीत आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या घरी जाऊन आले; पण अडीच वर्षे ज्यांची वकिली करत राऊत किल्ला लढवत होते, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला त्यांच्या घरी जावेसे वाटलेले नाही. कोणाकोणासाठी धावून जात नव्हते राऊत? सरकारमधील प्रत्येकावरचे आरोप अंगावर घेणारे राऊत आज एकटे पडले आहेत. शिवसेनेत असूनही त्यांनी ज्यांना निष्ठा वाहिली असल्याची टीका सातत्याने होत राहिली त्यांनी तर साधी प्रतिक्रिया देण्याचेही सौजन्य दाखविलेले नाही. हे झाले काकांचे; अन् पुतणे काय म्हणाले, ‘तपास संस्थांना तपास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ईडीच्या कारवाईमागचे नेमके कारण काय आहे ते स्वत: राऊतच सांगू शकतील...’ राऊत यांच्याबद्दलची माया आटली  की ईडीची भीती दाटली ते कळायला मार्ग नाही.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAtul Bhatkhalkarअतुल भातखळकरBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस