Maharashtra Political Crisis: “हिसाब तो होके रहेगा... प्रफुल्ल पटेल नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे धक्क्याला लागणार?”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 10:45 AM2022-08-18T10:45:53+5:302022-08-18T10:47:16+5:30

Maharashtra Political Crisis: मोहित कंबोजनंतर आणखी एका भाजप नेत्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर नाव घेत निशाणा साधला आहे.

bjp atul bhatkhalkar slams ncp praful patel over fifa issue and cj house case | Maharashtra Political Crisis: “हिसाब तो होके रहेगा... प्रफुल्ल पटेल नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे धक्क्याला लागणार?”

Maharashtra Political Crisis: “हिसाब तो होके रहेगा... प्रफुल्ल पटेल नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे धक्क्याला लागणार?”

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता भाजपच्या निशाण्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा बडा नेता आता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटायला जाईल, असे ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले होते. त्यानंतर राजकीय राजकारणात खळबळ उडाली आहे. यातच आता प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत भाजपने ट्विट करत कोणत्या प्रकरणात कारवाई होणार, असा प्रश्न केला आहे. 

भाजप नेते मोहित कंबोज यांनी, लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असा इशारा कंबोज यांनी ट्विटमधून दिला. तसेच २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याची बंद कलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली असून, मोहित कंबोज आणि भाजपविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत टीकास्त्र सोडले आहे. 

हिसाब तो होके रहेगा...

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रफुल पटेल नेमके कशामुळे धक्क्याला लागणार? FIFA कांड की CJ house प्रकरणामुळे? अशी विचारणा करत, हिसाब तो होके रहेगा..., असे ट्विट केले होते. तत्पूर्वी, फुटबॉलची जागतिक संघटना फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी लादली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) माजी अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल या साऱ्या वादाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई करत मुंबईतील वरळी येथील सीजे हाउस या आलिशान इमारतीतील चार मजल्यांवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली आहे. हे प्रकरण ड्रग माफिया इक्बाल मिर्ची याच्याशी निगडित असून, या प्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रफुल्ल पटेल यांची १२ तास चौकशी केली होती. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधलाय.
 

Web Title: bjp atul bhatkhalkar slams ncp praful patel over fifa issue and cj house case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.