शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Ashish Shelar : "माझं कुटुंब माझी जबाबदारी; माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली"; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 11:05 IST

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.

राज्याच्या राजकारणात गेल्या आठवड्यात मोठा राजकीय भूकंप घडला. त्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत थेट शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सहभागी झाल्याचा दावा अजित पवारांकडून करण्यात आला. अजित पवार आणि इतर नेत्यांनी उचललेल्या पाऊलाने राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. याच दरम्यान भाजपाने हल्लाबोल केला आहे. 

"माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली" असं म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. "राजकीय पटलावर भाजपाने नारा बदलला आता "छोट कुटुंब सुखी कुटुंब" नाही तर भाजपाचा नारा स्पष्ट...मोठ कुटुंब सुखी कुटुंब!!" असं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"ज्यांचा नारा आमचा पक्ष आमचेच वर्षानुवर्षे घराणे...ज्यांचा नारा "माझ कुटुंब माझी जबाबदारी" ज्यांचा नारा  "माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली"या सगळ्यांना देशहितासाठी, तरुणांना संधी देण्यासाठी कधीतरी छेद देण्याची गरज होती.म्हणून राजकीय पटलावर भाजपाने नारा बदललाआता "छोट कुटुंब सुखी कुटुंब" नाही तरभाजपाचा नारा स्पष्ट...मोठ कुटुंब सुखी कुटुंब!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आले असता नागपुरात आयोजित सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले असून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. नागपुरात भाजपा कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं"जे "मी आणि माझं कुटुंब" एवढंच जगतात थोडक्यात काय तर जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात!" असं म्हणत निशाणा साधला होता. तसेच "जे नाल्यातील गाळ खातात, कोविडमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करतात, गरिबांच्या पोरांच्या दप्तर, पाटी पेन्सिल मध्ये पण कट कमिशन खातात" असं म्हणत हल्लाबोल केला होता.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार