Ashish Shelar : "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड म्हणून मिरवायचं"; आशिष शेलारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:37 PM2022-08-18T12:37:05+5:302022-08-18T12:44:01+5:30

BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray : आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray Over Dahihandi and Politics | Ashish Shelar : "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड म्हणून मिरवायचं"; आशिष शेलारांचा हल्लाबोल

Ashish Shelar : "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड म्हणून मिरवायचं"; आशिष शेलारांचा हल्लाबोल

Next

मुंबई - राजकीय सत्तासंघर्ष शिगेला गेला अन् महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) कोसळले. शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis)  यांचे नवे सरकार आले. यानंतर भाजपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत केले असून, भाजप मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी वरळीत भव्य दहीहंडी उत्सवाचे (Dahi Handi 2022) आयोजन केले आहे. या खेळीने आशिष शेलार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे..." असं म्हणत निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे..." आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत... लवकरच... मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत "करुन दाखवतील" आमचं ठरलंय!!" असं म्हटलं आहे. 

"ज्या वरळीत सेनेच्या (?) खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे  पक्षाला द्यायच्या 100 रूपयांच्या शपथपत्राला "बळ"  अपुरे पडतेय... दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय..." असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकांच्या मोर्चेबांधणीची सुरुवात युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून केल्याचे सांगितले जात आहे. भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव जांबोरी मैदानात हा उत्सव पार पडणार आहे. 

दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आशिष शेलार महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरळीतील कोळी बांधवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. शिवसेना नेते आणि आमदार सचिन अहिर दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत असतात. सचिन अहिर आणि वरळीतील दहीहंडी उत्सव हे समीकरण ठरलेले आहे. पण यंदा पहिल्यांदाच भाजपने सर्वांत आधी जांबोरी मैदान पटकावून अहिर यांच्यावर मात केली आहे. 
 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Shivsena Aaditya Thackeray Over Dahihandi and Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.