शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Ashish Shelar : "विश्वविख्यातांनी काढला नसता बाप तर झाला नसता मालकांना ताप"; आशिष शेलारांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 10:46 IST

BJP Ashish Shelar slams Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

संजय राऊत यांनी "भाजपाने आधी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक इतिहास घडवत नाहीत ते दुसऱ्यांचे इतिहास नष्ट करण्याचे प्रयत्न करत असतात. पण कितीही प्रयत्न केला तरी त्यांनी तसे करता येणार नाही. बाळासाहेबांचा, शरद पवारांचा इतिहास पुसला जाणार नाही" असा स्पष्ट इशारा भाजपाला दिला. यानंतर भाजपाने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "विश्वविख्यात प्रवक्ते, शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की हा दिल्लीचा डाव?" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"...या प्रस्तुत प्रसंगी "जाणता राजा" हरला नाही, तर तो जिंकला... हे सांगण्यासाठी दरबारी राजकारणात "भाट" ठेवलेले असतातच... वेगवेगळ्या "माध्यमातून" भाट आपलं काम चोख करीत आहेत. विश्वविख्यात प्रवक्ते आणि शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की, हा तर दिल्लीचा डाव..? आमचं पुन्हा पुन्हा एकच म्हणणं जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आशिष शेलार यांनी याआधी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. "अहंकारी राजा आणि विलासी पुत्र एक विश्वविख्यात दरबारात... नॅनोत मावेल एवढेच उरले पदरात! ज्यांनी काढला आमचा बाप तेच उरले आज एक फुल दो हाफ!" असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यासोबतच  "झाला मोह "जाणत्या राजांना" याच संजयाचा, अखेर बसला फटका त्यांनाही शापित दरबाऱ्याचा, आम्ही सांगतं होतो वारंवार यांना आवरा कि हो, या तुमच्या विश्वविख्यातांना, आता बांधा पुतळा या तुमच्या विश्वविख्यातांचा, यापेक्षा काय सन्मान करणार या शापित दरबाऱ्यांचा!" असं देखील आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे