शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

Ashish Shelar : “पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 14:23 IST

BJP Ashish Shelar And Shivsena : भाजपाने दसरा मेळाव्यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?” असं म्हणत बोचरी टीका केली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. याच दरम्यान आता भाजपाने दसरा मेळाव्यावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

“पेंग्विन सेनेचा दसरा... शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला?” असं म्हणत बोचरी टीका केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेचे साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!” असं म्हणत शेलारांनी खोचक टोलाही लगावला आहे. 

“काय तो पेंग्विन सेनेचा दसरा…”

“काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेचे साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!, सगळा गोंधळ घालून बघा घड्याळ कसे नामानिराळे संसार तिघांचा प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले. काय तो भारतजोडो…काय तो पेंग्विन सेनेचा दसरा… शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, हातच्या कंकणाला आरसा कशाला? सगळं कसं ok मध्ये आहे”असं आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?"

भाजपाचे नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "महत्वपूर्ण... दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कचे मैदान  भरावे म्हणून पेंग्विन सेनेने  मागितली राष्ट्रवादी तथा काँग्रेसकडे मदत...  आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरणार शिवाजीपार्क मैदान... काय सत्य? महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते" असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना