शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने मागितली रामदास आठवलेंची माफी; बावनकुळे म्हणाले, "महायुतीमध्ये त्यांचे स्थान..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 08:43 IST

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास आठवले यांची माफी मागितली आहे.

Chandrashekhar Bawankule : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळावरुन नाराजीनाट्य सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरच्या राजभवनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याचे महायुतीचा भाग असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. यावरून रामदास आठवले यांनी आपली  उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. तसेच मंत्रीपद न मिळाल्याचीही खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपकडून याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास आठवले यांची माफी मागितली आहे.

नागपूरमध्ये १५ डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा पार झाला. या मंत्रिमंडळात भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३९  आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. मात्र यावेळी महायुतीचा भाग असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला एकही मंत्रिपद मिळाले नाही. तसेच मंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रणही देण्यात न आल्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास आठवले यांची माफी मागितली. आमची मोठी चूक झाली असून त्यांना मंत्रिमंडळ शपथविधीचे निमंत्रणच दिले गेले नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवले यांना महायुतीतं मोठं स्थान -  चंद्रशेखर बावनकुळे

"महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम हा १४ डिसेंबर रोजी होणार होता. पण आमचे आमदार आधीच नागपूरला गेले होते. त्यामुळे शपथविधीचं स्थळ अचानक बदलले गेले. या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी मी सर्व पक्षांना पत्राच्या माध्यमातून निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, मी स्वत: जाऊन रामदास आठवले यांना निमंत्रण द्यायला पाहिजे होतं, ते देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. रामदास आठवले यांची मी माफी देखील मागितली आहे. रामदास आठवले यांचं आमच्या महायुतीतं मोठं स्थान आहे. त्यांची जी कोणती मागणी असेल त्याबाबत आमचं केंद्रातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य निर्णय घेतील. आम्ही त्यांचा आदर करतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

काय म्हणाले होते रामदास आठवले?

"महायुतीचा एक भाग असूनही शपथविधीचं मला निमंत्रण आलं नाही. जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा मला सगळीकडे नेलं जातं. आता शपथविधीसाठी मला निमंत्रणही मिळालं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. आमचा समाज मोठ्या संख्यने भाजपबरोबर राहिला. तरीही लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा रिपब्लिकन पार्टीला दिली नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीतही एकही जागा आम्हाला दिली नाही," असं रामदास आठवलेंनी म्हटलं.

"आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या, त्यांनी आम्हाला किमान एक विधानपरिषदेची जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टीचा एकही चेहऱ्याला संधी मिळाली नाही. अडीच वर्षांच्या सरकामध्येही आमच्या पक्षाचा एकही मंत्री नव्हता. मला वाटतं की गावागावत आमचे कार्यकर्ते आहेत. पण आता त्यांना कसं तोंड दाखवायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे," असंही रामदास आठवले म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे