काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना नथुराम याच्याशी केल्याने भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''गांधीवादी म्हणवून घेणाऱ्या हर्षवर्धन सकपाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना नथुराम गोडसे याच्याशी करून आपल्या बौद्धिक अगोचरपणाचे हीन दर्शन घडवले आहे. हे कसले गांधीवादी?, असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, तुमच्या पक्षातच एक गोडसे दररोज गांधीवादाची हत्या करतोय आणि तुमच्यासारखे अनेक नवगांधींचे गुलाम त्याची भजने गात गावगन्ना हिंडताय. गांधींजी हत्या करणाऱ्या गोडसेची तुलना करायचीच असेल तर ती गांधी नाव धारण करून देशाची दिशाभूल करणाऱ्या परिवाराशी आणि त्या परिवाराच्या वारसा हक्कातून कॉंग्रेसवर हुकूमत गाजविणाऱ्या राहुल गांधीशीच करावी लागेल, असा टोला उपाध्ये यांनी लगावला.
Web Summary : BJP strongly criticized Congress leader's comparison of Fadnavis to Nathuram. BJP retorted that Rahul Gandhi is the real threat to Gandhian values, accusing him of misleading the nation and undermining the constitution.
Web Summary : भाजपा ने कांग्रेस नेता द्वारा फडणवीस की नथूराम से तुलना की कड़ी आलोचना की। भाजपा ने पलटवार करते हुए कहा कि राहुल गांधी ही गांधीवादी मूल्यों के लिए असली खतरा हैं, उन पर देश को गुमराह करने और संविधान को कमजोर करने का आरोप लगाया।