शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

भाजपाकडूनही घराणेशाहीलाच बळ, उमेदवारांना मिळालं 'पूर्व पुण्याई' फळ 

By महेश गलांडे | Published: March 21, 2019 10:40 PM

भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली.

मुंबई - भाजपाने आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावे प्रामुख्याने घोषित करण्यात आली. त्यामध्ये 14 विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली असून यातून भाजपानेही घराणेशाहीलाच बळ दिल्याचे दिसून येत आहे. किंबहुना, या तरुण उमेदवारांना पूर्व पुण्याईचं फळ मिळाल्याचं भाजपाच्या पहिल्या उमेदवार यादीवरुन जाहीर होत आहे. कारण, भाजपाकडून 16 उमेदवारांच्या यादीत पुन्हा एकदा ज्येष्ठ नेत्यांच्याच मुलांना संधी देण्यात आली आहे. 

भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. या 16 उमेदवारांमध्ये दोन नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात, नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर लातूरमध्ये डॉ. सुनिल गायकवाड यांऐवजी सुधाकर शृंगारे यांना संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची घराणेशाही पुढे भाजपातही जोपासण्याचं काम येथे झाल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर, आज भाजपाच्या पहिल्याच यादीत त्यांच नाव जाहीर करण्यात आलं आहे. 

तसचे, बीडमधून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या खासदार प्रितम मुंडेंना, नंदूरबार लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून काही वर्षांपूर्वी भाजपात आलेले विजयकुमार गावित यांच्या कन्या विद्यमान खासदार हिना गावित यांना, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांना भाजपाने मुंबई उत्तर-मध्य येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाने जाहीर केलेल्या 16 उमेदवारांपैकी 05 उमेदवार हे घराणेशाहीचीच परंपरा जपणारे असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे नेहमीच काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपानेही तीच 'री'.. ओढल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, भाजपाच्या पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाचा समावेश आहे. तसेच, रावसाहेब दानवे, सुभाष भामरे, हंसराज अहिर याही दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. 

भाजपाच्या 16 लोकसभा उमेदवारांची नावे  

महाराष्ट्र प्रदेश 

नागपूर – नितीन गडकरी

नंदुरबार – हिना गावित

धुळे – सुभाष भामरे

रावेर – रक्षा खडसे

अकोला – संजय धोत्रे

वर्धा – रामदास तडस

चिमूर-गडचिरोली – अशोक नेते

जालना – रावसाहेब दानवे

भिवंडी – कपिल पाटील

मुंबई नॉर्थ – गोपाळ शेट्टी

मुंबई नॉर्थ सेंट्रल – पूनम महाजन

नगर – सुजय विखे

बीड – डॉ. प्रीतम मुंडे

लातूर – सुधाकरराव श्रृंगारे

सांगली – संजयकाका पाटील 

चंद्रपूर - हंसराज अहिर

टॅग्स :BJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेPoonam Mahajanपूनम महाजनPritam Mundeप्रीतम मुंडे