BJP activist has to land said Devendra Fadnavis | एक मोहीम गमावली म्हणून, पूर्ण लढाई हरलो असं नाही: फडणवीस

एक मोहीम गमावली म्हणून, पूर्ण लढाई हरलो असं नाही: फडणवीस

मुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेल असे वचन मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या जीवावर शिवसेनेच्या मुख्यमंत्री बनवणार असल्याचे वचन दिले होते का, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर आम्ही एक मोहीम गमावली म्हणून, पूर्ण लढाई हरलो असं होत नसल्याचे सुद्धा ते म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत जाण्याच्या निर्णयावरून बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं. तसेच विश्वासघात तर झालाच आहे, मात्र आता रडायचं नाही तर लढायचं. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याने मैदानात उतरले पाहिजे,असे फडणवीस म्हणाले.

तर आता ही लढाई आपल्याला जिंकायची असून, एखादी मोहीम हरल्याने ती लढाई मागे पुढे होत नाही. एखाद्या विश्वासघातानं सरकार गेले तर आपण हात-पाय गाळून बसणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे विरोधी पक्षांची भूमिका सुद्धा ताकदीने निभावली पाहिजे. अंगचोरून काम होत नाही. विरोधी पक्षात काम करायचे असेल तर रस्त्यावर भिडाव लागतं,समाजाच्या वेदना मांडाव्या लागतात, असेही ते म्हणाले.


 

Web Title: BJP activist has to land said Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.