बायोफोकलचे प्रवेश टफ

By Admin | Updated: July 1, 2014 00:53 IST2014-07-01T00:53:05+5:302014-07-01T00:53:05+5:30

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेशप्रक्रियेमधला मंगळवारी महत्त्वाचा टप्पा आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी दुपारी २ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Biofocal entry Tough | बायोफोकलचे प्रवेश टफ

बायोफोकलचे प्रवेश टफ

अकरावी प्रवेश : गुणवत्ता यादी आज
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेशप्रक्रियेमधला मंगळवारी महत्त्वाचा टप्पा आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी दुपारी २ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी धनवटे नॅशनल महाविद्यालयासोबतच केंद्रीय प्रवेश समितीच्या संकेतस्थळावरदेखील विद्यार्थी पाहू शकतात अशी माहिती देण्यात आली आहे.अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला १७ जूनपासून सुरुवात झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा जास्त कल द्विलक्षी अभ्यासक्रमांकडे असतो. यंदादेखील द्विलक्षी अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत.
वेळापत्रकानुसार स्पॉट अ‍ॅडमिशन
द्विलक्षी अभ्यासक्रमांच्या ५,२५२ जागा आहेत. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे रविवारी ‘चेकलिस्ट’ लावण्यात आली होती. मंगळवारी दुपारी २ वाजता यादी जाहीर झाल्यानंतर ३ जुलैपासून द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात होईल. धनवटे नॅशनल महाविद्यालय येथेच वेळापत्रकानुसार ‘स्पॉट अ‍ॅडमिशन’चे काम चालेल. यावेळी विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. ११ जुलैपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया चालेल. यानंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेची गुणवत्तायादी घोषित करून प्रवेश देण्यात येईल. द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित झाल्यानंतर विज्ञान शाखेत केलेल अर्ज प्रवेशासाठी विचारात घेतले जाणार नाहीत असे केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव डॉ.एस.एन.पटवे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Biofocal entry Tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.