शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

Bio Diversity day : ...तर निसर्गातील काजवा होईल लुप्त; सावधगिरीने करा त्यांच्या दुनियेत प्रवेश

By azhar.sheikh | Published: May 22, 2018 2:24 PM

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पर्यटकांची महिनाभर जत्रा भरते. यावेळी काही मद्यपी पर्यटक धिंगाणा घालत काजव्यांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात. ज्या झाडांवर काजवे चमकतात त्या झाडांवर चढून काजवे धरण्याचा अट्टहास काजव्यांच्या जीवावर उठत आहे.

ठळक मुद्दे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांची दुनिया

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृध्द वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासणा करत आहे. नैसर्गिक जैवविविधतेमधील महत्त्वाचा व आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण किटक अर्थात काजवा लुकलुकतो. त्याचे हे लुकलुकणे जरी मादीला आकर्षित करण्यासाठी असले तरी त्यांचा अंधारातील हा खेळ माणसालाही तितकाच आकर्षित करतो. त्यामुळेच नाशिकपासून अगदी ७० किलोमीटरवरील भंडारदरा परिसरातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पर्यटकांची महिनाभर जत्रा भरते. यावेळी काही मद्यपी पर्यटक धिंगाणा घालत काजव्यांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात. ज्या झाडांवर काजवे चमकतात त्या झाडांवर चढून काजवे धरण्याचा अट्टहास काजव्यांच्या जीवावर उठत आहे.

निसर्गात बागडताना त्याचा आनंद लुटताना बेभान होऊन चालणार नाही. निसर्ग व त्यामधील जैवविविधता वाचवायची असेल तर मानवाला भानावर यावेच लागणार आहे. कारण वैश्विक तपमान वृध्दीच्या स्वरुपात पर्यावरणाचा होणाऱ्या -हासाचे ‘काजवे’ जगापुढे चमकायला लागले आहे, हे तितकेच खरे. अभयारण्यातील वृक्षसंपदेवर जोपासना होणा-या या किटकामुळे या अभयारण्याने वेगळे नावलौकिक मिळविले आहे. काजवारुपी प्रकाशफुलांच्या आविष्कारासाठी हे अभयारण्य राज्यात प्रसिध्द आहे. हा आविष्कार अभयारण्यातील वृक्षसंपदेवर लवकरच बघावयास मिळणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींना याचे वेध लागण्यास सुरूवात झाली आहे. काजव्यांच्या दुनियेत सावधपणे पाय ठेवण्याची गरज आहे.

वैशाख सरू झाला की या अभयारण्यामधील भंडारदरा ते राजूरपर्यंतच्या गावांच्या परिसरातील वातावरण बदलू लागते अन् मग निसर्गप्रेमींना चाहूल लागते ती सह्याद्रीच्या गिरीकंदात झगमणाºया काजव्यांच्या दुनियेचे. वैशाखनंतर काजव्यांची उत्पत्तीचा काळ जवळ येतो. रोहिणी, मृग नक्षत्रामध्ये काजवे अधिक चमकू लागतात. त्याअगोदर वळवाचा पाऊस झाला की काजव्यांच्या या अद्भूत दुनियेने जणू अभयारण्यातील वृक्षसंपदा रात्रीच्या काळोखातही उजळून निघते. अहमदनगरच्या तालुक्यामधील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील घाटघर-साम्रद व भंडारदरा-रतनवाडी या मार्गांवर काजव्यांची दुनिया पहावयास मिळते. हा परिसर जरी इगतपुरी व नाशिकपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे मुंबईकर, नाशिककर तसेच पुणेकरांनाही संगमनेर-राजुरमार्गे हे अभयारण्य सोईस्कर पडते. राहिणी किंवा मृगाच्या सरी बरसल्या की, जणू नभोमंडळातील तारकादळेच अभयारण्याच्या कुशीत उतरल्याचा भास होतो. चहुबाजूला विविध प्रजातीच्या झाडांवर काळ्याकुट्ट अंधारात काजव्यारुपी प्रकाशफुलांचा लखलखाट पहावयास मिळतो. निसर्गाची ही अद्भूत किमया केवळ डोळ्यांच्या कॅमे-यात टिपता येते आणि या प्रकाशफुलांनी उजळलेले झाड डोळ्यांनी न्याहाळण्याची मजा काही औरच असते.

दरवर्षी अभयारण्यात ही दुनिया अनुभवण्यासाठी महिनाभर निसर्गप्रेमींची वर्दळ पहावयास मिळते. मुंबईकरांसह नाशिककर, पुणेकर व नगरकर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या भागातील आदिवासी लोकांना रोजगारदेखील काही प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होते. लक्ष-लक्ष काजव्यांचा नैसर्गिक आविष्कार डोळ्यांची पारणे फेडणारा ठरतो; मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांचे डोळे जणू हा आविष्कार बघून विस्फारतात की काय? अशी शंका येते. अशा विकृतांकडून अशा अद्भूत नजारा अनुभवला तर जात नाही मात्र तो नजारा बिघडविण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी अशा विकृ त प्रवृत्तीच्या लोकांवर नाशिक वन्यजीव विभागाचा ‘वॉच’ राहणार आहे. ग्रामस्थ व गाईडच्या मदतीने वनविभाग पर्यटकांच्या धिंगाण्याला चाप लावणार आहे.

पायी भ्रमंतीला प्राधान्य द्यावेचारचाकी किंवा दुचाकीवर फेरफ टका मारुन काजव्यांच्या दुनियेचा आनंद घेता येतो हा गैरसमज निसर्गप्रेमींनी प्रथमत: दूर करायला हवा. वन्यजीव विभागाने निश्चित केलेल्या वाहनतळामध्ये शिस्तीने वाहने उभी करुन पायी भ्रमंती करत काजव्यांनी लखलखले झाड बघण्याची मजा लुटावी, असे आवाहन भंडारदरा, अकोले विभागातील निसर्गप्रेमींसह नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांनी केले आहे.या झाडांना काजव्यांची पसंतीअभयारण्यातील वृक्षसंपदेवर काजव्यांचे नृत्य काळोखात सुरू असते; मात्र काजवे अधिकाधिक पसंती काही निवडक प्रजातीला देतात. बेहडा, हिरडा, सादडा, जांभूळ अशा झाडांवर काजव्यांचा आधिवास मोठ्या संख्येने पहावयास मिळतो. यावेळी काजव्यांच्या नृत्याला जणू रातकिडे एकप्रकारे आपल्या आवाजाने दाद देत असतात.जुनच्या मध्यापर्यंत लाखोंची संख्या

काजव्यांची संख्या वातावरणातील दमटपणावर अवलंबून आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर काजव्यांची उत्पत्तीला प्रारंभ होतो; मात्र जुनच्या मध्यापर्यंत काजव्यांची संख्या लाखोंच्या पुढे गेलेली दिसून येते. पावसाच्या प्रारंभी काजवे मोठ्या प्रमाणात वाढतात.त्यांच्या प्रजनन काळ येतो धोक्यातमोर लांडोरला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतो तसाचा काजवा हा किटकही आपल्या मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. नर काजवा चमचम करत मादीला आपल्याकडे आकर्षित करत असतो म्हणजेच हा खरा तर या किटकाचा प्रजननाचा काळ असतो. यामुळे निसर्गप्रेमींनी या काजव्यांच्या अद्भूत दुुनियेत प्रवेश करतात तितकीच सावधगिरी व खबरदारी बाळगायला हवी अन्यथा दुर्मीळ झालेला काजवा कायमचा लुप्त होण्यास वेळ लागणार नाही हे तितकेच खरे.

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवसAhmednagarअहमदनगरforest departmentवनविभागNashikनाशिक