सरकारच्या डिजिटल कारभाराला बिल गेट्स यांचे सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:41 IST2025-03-21T12:40:26+5:302025-03-21T12:41:11+5:30

सह्याद्री अतिथीगृहावर बिल गेट्स यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र परिवर्तन टप्प्यातून जात असल्याने पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्यामध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाउंडेशने सहकार्य करावे.  

Bill Gates' support for government's e governance | सरकारच्या डिजिटल कारभाराला बिल गेट्स यांचे सहकार्य

सरकारच्या डिजिटल कारभाराला बिल गेट्स यांचे सहकार्य

मुंबई : सरकारचा डिजिटल कारभार (ई-गव्हर्नन्स) व राइट टू सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राला देशात अव्वलस्थानी आणण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. स्वयंरोजगाराद्वारे २५ लाख महिलांना लखपती दीदी बनविण्यासाठीच्या उपक्रमात या फाउंडेशनची भागीदारी असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यात याबाबत गुरुवारी चर्चा झाली.

सह्याद्री अतिथीगृहावर बिल गेट्स यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र परिवर्तन टप्प्यातून जात असल्याने पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्यामध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाउंडेशने सहकार्य करावे.  

फडणवीस यांना आमंत्रण
बिल गेट्स यांनी फडणवीस यांना सिएटल भेटीचे आमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, गेट्स फाउंडेशनचे भारतातील संचालक हरी मेनन, आरोग्य सल्लागार डॉ. आनंद बंग उपस्थित होते.
नवी मुंबईत ३०० एकरात इनोव्हेशन सिटी करण्यात येत आहे. त्यासाठीही गेट्स यांचे सहकार्य मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Bill Gates' support for government's e governance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.