अकोला महापालिकेच्या सभेत प्रचंड गोंधळ
By Admin | Updated: June 30, 2016 19:36 IST2016-06-30T18:29:16+5:302016-06-30T19:36:03+5:30
महापालिकेने रस्ते विकासासाठी नगरसेवकांना वार्ड निहाय दिलेला निधी हा पक्ष पाहून दिला आहे. सर्व नगसेवकांना सारखा निधी देणे गरजेचे असताना सत्ताधारी नगरसेवकांना

अकोला महापालिकेच्या सभेत प्रचंड गोंधळ
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ३० - महापालिकेने रस्ते विकासासाठी नगरसेवकांना वार्ड निहाय दिलेला निधी हा पक्ष पाहून दिला आहे. सर्व नगसेवकांना सारखा निधी देणे गरजेचे असताना सत्ताधारी नगरसेवकांना जादा निधी दिल्याच्या आरोप करीत महापालिकेच्या सभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळामध्ये भारीपचे नगरसेवक रामा तायडे हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला मार लागला आहे. नगरसेवक गोपी ठाकरे व भारीपचे गटनेते गजानन गवई यांच्यामध्ये हमरी तुमरी झाली. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण होत असल्याचे लक्षात आल्यावर महापौर उज्वला देशमुख यांनी चित्रिकरण थांबविण्याची सुचना केली असता काँग्रेसचे नेते मदन भरगड यांनी या सूचनेला आक्षेप घेतला व काही काळ कॅमेरा हिसकला होता. या प्रकारानंतर आयुक्त अजय लहाने यांनी बैठक सोडून आपली कॅबिन गाठली.