छोटे बनले मोठे ग्राहक
By Admin | Updated: November 9, 2014 01:18 IST2014-11-09T01:18:04+5:302014-11-09T01:18:04+5:30
जाहिरात म्हणजे नॅनो चित्रपटच़़़ वीस सेकंदांचा़़़ भावनांचा खेऴ़़ त्यामुळे जाहिरात क्षेत्रत मिनिट नव्हे, तर प्रत्येक सेकंद महत्त्वाचा मानला जातो.

छोटे बनले मोठे ग्राहक
जाहिरात म्हणजे नॅनो चित्रपटच़़़ वीस सेकंदांचा़़़ भावनांचा खेऴ़़ त्यामुळे जाहिरात क्षेत्रत मिनिट नव्हे, तर प्रत्येक सेकंद महत्त्वाचा मानला जातो. जागतिक पातळीवर भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक उत्पादनास विक्रीमूल्य आहे, उठाव आहे. कोणतीही वस्तू येथे विकली जाते. परंतु यासाठी अलीकडे नवनवीन उत्पादनांची जाहिरात करण्याची व मार्केटमध्ये त्या उत्पादनाची माहिती उत्तम पद्धतीने प्रसारित करण्याची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत उतरण्यासाठी अनेक कंपन्या सरसावल्या आहेत. मूळ उत्पादन व त्यातील वैशिष्टय़े सांगण्यासाठी कमीत कमी शब्दांत आणि जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचावे म्हणून अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जातात.
येत्या 14 नोव्हेंबरला बालदिन’ साजरा होतोय. नव्या जमान्याचा बालक आता बुद्धिमत्तेने कितीतरी पुढे गेलाय. डिजीटलायङोशनचे परिणाम बालमनावर होताना दिसताहेत. शहरी मध्यमवर्गीयांबरोबरच खेडय़ापाडय़ाचा बालवर्गही टीव्हीच्या जमान्यात वेगाने कल्पनाविश्व बदलताना दिसतो आहे. हाच धागा पकडून बाजार मांडलेल्या कंपन्यांनी या छोटय़ांना मोठा ग्राहक बनवून टाकले आहे. आजची मुले ही घरातल्या निर्णयात कर्तीधर्ती झालेली दिसतात. काय आहे हे मार्केटिंगचे नवे बालविश्व’? हेच शोधण्याचा विविध अंगाने केलेला हा प्रयत्न..
मुले होताहेत डिसिजन मेकर
गेल्या काही वर्षापासून जाहिरात क्षेत्रत बालग्राहकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यात प्राथमिक ग्राहक आणि प्रभावी ग्राहक अशी वर्गवारी आहे. यात प्राथमिक ग्राहक म्हणजे लहान मुलांची उत्पादने असणारा जाहिरातदारांचा वर्ग. दुस:या वर्गात टीव्ही, श्ॉम्पू, मोबाइल्स या जाहिरातींमध्ये बालग्राहकांची महत्त्वाची भूमिका असते. या लहान मुलांच्या उत्पादनांच्या जाहिराती बनविणो हे फार कठीण नसते; कारण त्यात केवळ गोंडस, सुंदर चिमुरडय़ांचा समावेश केल्याने या जाहिराती लक्षवेधी ठरतात. मात्र सात वर्षे वयोमर्यादा असलेल्या आणि त्यापुढील लहान मुलांसाठी जाहिराती तयार करणो, हे दिवसेंदिवस अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. या वयोगटातील मुलांसाठी जाहिराती तयार करताना त्यांची मानसिकता, समज, परिणाम आणि अपेक्षा या सर्वाचा विचार करावा लागतो.
काही वेळा ठरावीक जाहिरातींसाठी त्या त्या वयोगटातील मुलांशी संवाद साधून अभ्यासपूर्ण संशोधन केले जाते. या प्रक्रियेतून त्या मुलांच्या आवडीनिवडीचा नेमकेपणा लक्षात घेतला जातो. आता लहान मुलांचीही ‘स्मार्ट’ जनरेशन असल्यामुळे ही पिढीसुद्धा जाहिराती क्रॉस चेक करू शकते, याचाही विचार केला जातो. कारण पूर्वीची लहान मुले माहितीपूर्ण ज्ञानापासून अनभिज्ञ होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. समाजातील घडामोडींबद्दल लहान मुलेही अॅलर्ट झाल्याने जाहिरातीच्या प्रक्रियेत याचाही विचार करावा लागतो. आताच्या बालग्राहकांवरही सोशल मीडियाचा प्रभाव असल्याने ही पिढी खूप फास्ट झाली आहे. शिवाय जाहिरात क्षेत्रतील स्पर्धा वाढल्यामुळे सततचा भडिमार त्यांच्यावर होतोय. यातून आपले नाणो खणखणलेच पाहिजे, यासाठी क्षणक्षणाला ‘काटे की टक्कर’ सुरू असते.
पूर्वी जाहिराती सूचना आणि विधान स्वरूपात असत, फक्त टाईप केल्यासारखी. ती जाहिरात आहे हे समजून येण्यासाठीही चौकट असायची. परंतु समाजातील बदल जसे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झाले तसे जाहिरातींच्या स्वरूपामध्ये समाजातील बदलांमुळे झाले. जाहिरातीत तांत्रिक बदल, दृश्य स्वरूपातील बदल आणि त्यामागील संकल्पना, भाषेतील बदल प्रामुख्याने दिसून आले. तांत्रिक बदलामुळे जाहिरातीत उत्पादनाचे चित्र आले आणि जाहिरातींचा नूर पालटला.
जाहिरातींचे स्वरूप बदलण्यासाठी जाहिरात एजन्सीचाही त्यात मोठा वाटा आहे. जाहिरातीतून द्यायच्या संदेशावर अभ्यास करताना मानवी मनाच्या कंगो:यांचा विचार करावा लागतो. वयोगटानुसार, प्रांतानुसार यात बदल होण्याची शक्यता असते. कारण प्रत्येक ठिकाणच्या राहणीमानात, आर्थिक स्थितीत आणि नीतिमूल्यांच्या कल्पनेत मोठा फरक असतो. आपला ग्राहक, त्याचा लक्ष्यगट ठरविणो, त्याची मानसिकता आणि गरजा लक्षात घेणो, हे जाहिरातीच्या पुढील वाटचालीसाठी फार मोलाचे ठरते.
बाजारपेठेतील उत्पादनांबाबत जाहिरातदार आपल्याला माहिती देत असले तरी त्याचे काही नकारात्मक परिणामही होतात. सध्या मुले टीव्ही, वृत्तपत्रे, इंटरनेट अशा वेगवेगळ्य़ा माध्यमांतून जाहिराती पाहात असतात. त्याचा मुलांवर प्रभाव पडत असतो. मुले निष्पाप आणि अपरिपक्व असतात. जाहिरातदार टीव्हीवर जाहिरात करतात, तेव्हा त्यामागे व्यावसायिक कंपनी आहे आणि विक्री करणो हा तिचा उद्देश आहे, हे त्यांना ठाऊक नसते. मुलांना खरेदी करण्यास भाग पडेल, अशा पद्धतीने तो आपली उत्पादने बाजारात आणत असतो, हे त्यांना समजत नाही. मात्र बालग्राहकांसाठीच्या जाहिराती भविष्यात अधिकच स्मार्ट होणार असून, अजून 1क् वर्षानी चित्र पालटलेले असेल. त्यात कदाचित माध्यम, भाषा आणि संकल्पना या चौकटींना छेद जाऊन ‘आऊट ऑफ द बॉक्स’ गोष्टी जाहिरात क्षेत्रत प्रवेश करतील. मात्र वर्षानुवर्षे जाहिरात क्षेत्रत बालग्राहकांची भूमिकाही ‘डिसिजन मेकर’ असेल, एवढे मात्र निश्चित!
(लेखक सजर्नशील जाहिरात तज्ज्ञ आहेत़)
शब्दांकन - स्नेहा मोरे
जाहिरात संकल्पना बदलत आहेत
जाहिरात संकल्पनेत बदल होत असल्याने जाहिरातींचे मेसेज ग्राहकांचा विचार करून तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे जाहिरातींची उपयुक्तता आणि परिणामकारकता दिवसेंदिवस वाढत गेल्याने जाहिरातींचा वापर केवळ उत्पादनाच्या विक्रीपुरता मर्यादित राहिलेला नाही. जाहिरातींमधून द्यायच्या संदेशावर अभ्यास करताना मानवी मनाच्या कंगो:यांचा विचार करावा लागतो.
- भरत दाभोळकर