शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:45 IST

Maharashtra Assembly Election 2024 : उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, तर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महिला शिलेदाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदावर प्रशंसा मनोज अंबेरे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर आजपासून सर्व उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेल्या सौ. प्रशंसा मनोज अंबेरे यांचा अर्ज बाद झाला आहे. अंबेरे या अकोल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने 138 उमेदवार जाहीर केले होते, मात्र आता एक अर्ज बाद झाल्यामुळे मनसेचे 137 अधिकृत उमेदवार असतील.

अर्ज बाद होण्याचे कारण काय?प्रशंसा अंबेरे यांनी आपल्या उमेदवारीचा रितसर अर्ज दाखल केला. मात्र तपासणीदरम्यान प्रशांत यांचा अर्ज रद्द करम्यात आला आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची किमान 25 वर्षे पूर्ण असावी लागतात. मात्र प्रशंसा अंबेरे यांचे वय 24 वर्षे असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातही वयाचा उल्लेख आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांनी त्यांची संधी हुकली आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अकोल्यात काय चित्र?अकोला पश्चिम मतदारसंघातून महायुतीतून भाजपचे विजय अगरवाल निवडणूक लढवत आहेत. तर, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून साजिद खान आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राजेश मिश्रा अशा दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेAkolaअकोला