पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 22:14 IST2025-11-04T21:54:28+5:302025-11-04T22:14:33+5:30
पैलवान सिकंदर शेख याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी त्याला पंजाबमध्ये अटक केली होती.

पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमधील शस्त्र तस्करी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. पंजाबमधील कोर्टाने सिकंदर शेख याला जामीन मंजूर केला आहे. सिकंदर याच्यावर याआधी कोणताही गुन्हा दाखल नव्हता, तसेच देशाचा मोठा पैलवान असल्याची बाब लक्षात घेऊन जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
दोन दिवसापूर्वी पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला शुक्रवारी केलेल्या अटकेमुळे कुस्ती वर्तुळात गोंधळ उडाला होता. पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आली होती.
सुप्रिया सुळेंनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. "महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेख यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जी यांच्या संपर्कात होते. न्यायालयात आज सिकंदरची बाजू वकिलांनी अतिशय सक्षमपणे मांडली. अखेर त्याला आज जामीन मंजूर झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात परत येईल. या संपूर्ण प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्री महोदयांनी खुप सहकार्य केले याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच सिकंदरच्या वकिलांनी त्याची बाजू व्यवस्थितपणे मांडून त्याला जामीन मिळवून दिला, याबद्दल त्यांचेही मनापासून आभार', असे या पोस्टमध्ये सुळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेख यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जी यांच्या संपर्कात होते. न्यायालयात आज सिकंदरची बाजू वकिलांनी अतिशय सक्षमपणे मांडली. अखेर त्याला आज जामीन मंजूर झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात परत येईल. या संपूर्ण प्रकरणात…
— Supriya Sule (@supriya_sule) November 4, 2025