शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
2
सभांऐवजी शाखा भेटींवर भर, ठाकरे बंधूंची हटके रणनीती; 'शिवतीर्था'वर ११ तारखेला उद्धव-राज गर्जना
3
VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री संतापली! प्रचार रॅलीतील फटाक्यांमुळे घराला आग, कार्यकर्त्यांना सुनावलं
4
अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?
5
"हिंदुत्व विरोधी काँग्रेसची भाजपानं घेतली साथ, आता महापालिकेत परिणाम भोगा" शिंदेसेना संतप्त
6
महापुरुषांच्या फोटोसमोर महिलेला नाचवलं, उद्धवसेनेकडून 'तो' व्हिडिओ ट्विट; भाजपाचा पलटवार
7
Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागांत ७ तास पाणीपुरवठा राहणार बंद
8
केंद्र सरकारचा 'X' ला शेवटचा इशारा! 'Grok AI' मधील अश्लील मजकूर हटवण्यासाठी दिली डेडलाइन
9
अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 
10
"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत
11
Video: अपघाताने हात हिरावले, पण स्वप्ने नाही; रत्ना तमंगची कहाणी ऐकून जजेस झाले भावूक..!
12
खरंच किंग कोहलीनं पळ काढला? संजय मांजरेकरांचं कसोटीतील ‘विराट’ निवृत्तीवर मोठं वक्तव्य, म्हणाले…
13
भारत फिरायला आली अन् 'इथलीच' होऊन गेली; चक्क ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात पडली परदेशी तरुणी!
14
एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
16
फक्त एका कुपनच्या जोरावर जगाला लुटणारा 'महाठग'; आजही त्याच मॉडेलवर चालतात मोठमोठे स्कॅम
17
युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी
18
साखरपुडा झाला, पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
19
बंटी जहागीरदार कुठे पोहोचला? हत्या करणाऱ्यांना लोकेशनची माहिती देणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी कसे शोधले?
20
काहीही केलं तरी वजन कमीच होईना... 'रताळं' ठरेल सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पीक कर्जावर मुद्रांक माफ; राज्य सरकारचा निर्णय, १ जानेवारीपासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:30 IST

२ लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत, सर्व बँका, सहकारी संस्थांना बंधनकारक

पुणे : शेतीच्या पीक कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू झाली  आहे.या निर्णयानुसार २ लाख रुपयांपर्यंतच्या शेती पीक कर्जाशी संबंधित विविध दस्तऐवजांवर आकारले जाणारे मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे. यामध्ये पीक कर्जासाठी निष्पादित करण्यात येणारे करार, हक्कविलेख, निक्षेप, हडप, तारण किंवा तारण गहाण, हमीपत्र, गहाणखत, प्रतिभूती बंधपत्र, गहाणाची सूचना पत्रे, घोषणापत्र तसेच त्याला संलग्न असलेल्या कोणत्याही सल्ला किंवा करारपत्रांचा समावेश आहे.प्रत्येक कर्ज प्रकरणामागे ६०० रुपयांची बचत यापूर्वी शेतीच्या पीक कर्जावर प्रत्येक १ लाख रुपयांमागे ०.३ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. त्यानुसार दोन लाख रुपयांच्या कर्जासाठी सुमारे ६०० रुपयांचे मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागत होते. आता हे शुल्क पूर्णतः माफ करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या कर्ज खर्चात थेट कपात होणार आहे.

शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रिया होणार अधिक सुलभ राज्यभरात लागू होणारा हा निर्णय असून, सर्व बँका, सहकारी संस्था आणि कर्जवाटप करणाऱ्या यंत्रणांना तो बंधनकारक राहणार आहे. पीक कर्ज घेताना लागणाऱ्या कागदपत्रांवरील आर्थिक बोजा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.शेती उत्पादन खर्च, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचे वाढते दर लक्षात घेता हा निर्णय अत्यंत दिलासादायक असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. कर्ज घेण्यास प्रोत्साहन मिळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Farmers: Stamp Duty Waived on Crop Loans

Web Summary : Maharashtra waives stamp duty on crop loans up to ₹2 lakh, effective January 1st. Farmers save ₹600 per loan, simplifying access to credit for seeds, fertilizers, and labor, benefiting small and medium farmers.
टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार