शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 15:33 IST

आऊटगोईंगबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार हे काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची काल केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर आज सत्ताधारी महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू असलेल्या आऊटगोईंगबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार हे काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.

"तुमच्या पक्षातून मागील काही दिवसांपासून आमदार आणि नेते बाहेर पडत आहेत. सतीश चव्हाण यांच्यासह आमदार अतुल बेनके हेदेखील शरद पवारांना भेटून आल्याची चर्चा आहे. याबाबत तुमचं मत काय?" असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर भडकलेले अजित पवार म्हणाले की, "मी खंबीर आहे. तुम्ही सांगत असलेली माहिती खोटी आहे. अतुल बेनके कुठेही गेलेले नाहीत. ज्या आमदारांना मी तिकीट देणार नाही असेच लोक दुसऱ्या पक्षात जात आहेत. ज्यांना मी तिकीट देणार आहेत ते आमदार माझ्याच पक्षात आहेत," असा दावा त्यांनी केला आहे.

अजितदादांची साथ सोडण्याच्या वाटेवर कोणते नेते?

सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांच्या पक्षाला एका मागून एक हादरे बसत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्या पाठापोठ जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोहोळपाठोपाठ सांगोल्यातही बंड होणार, हे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.  सतीश चव्हाण यांनी एक पत्र लिहून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे आता सतीश चव्हाण यांनीही पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. तसेच चव्हाण हे सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी नेते आणि माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनीही आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार