शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin Yojna: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत छाननी होणार?; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:55 IST

Ladki Bahin Yojna: राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojna ( Marathi News ) : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पुढे काय होणार, याबाबत चर्चा रंगत आहे. तसंच या योजनेत छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार का, अशा चर्चांनाही उधाण आले होते. या सर्व चर्चा फेटाळत अशी छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

"लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे. कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरीत्या ही योजना राबवलेली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे," अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

"तक्रार आली तर छाननी"

"एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी केली जाते. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती. आता नव्याने तक्रार आली असेल तर मला त्याबाबत माहिती नाही. पण तक्रारी असतील तरच त्याबाबतीतच छाननी होईल, मोठ्या प्रमाणात या योजनेत छाननी होणार नाही," असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाल्यानंतर काय म्हणाले होते फडणवीस?

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजनेबाबत आपली भूमिका मांडली होती. "लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना पुढेदेखील सुरूच ठेवली जाईल. त्यात वाढ करून २१०० रुपये दरमहा दिले जातील. पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू. राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील. २१०० रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासने दिली आहेत, ती नक्कीच पूर्ण करू. त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे, ती आपण करू आणि जे लोक निकषाच्या आत बसतील, त्यांना योजनांचा लाभ नक्कीच होईल. कोणीही वंचित राहणार नाही. लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याची महायुती सरकारची अजिबातच मानसिकता नाही," असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Aditi Tatkareअदिती तटकरेWomenमहिलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार