शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: शरद पवार मुख्यमंत्री होणार?; 'असा' ठरला सत्तावाटपाचा फॉर्म्युला

By अतुल कुलकर्णी | Updated: November 2, 2019 21:41 IST

राज्याच्या सध्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी समोर आली आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई - सत्तास्थानांच्या समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या सध्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी समोर आली आहे. महायुतीला सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात येण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या नावाला शिवसेना आणि काँग्रेसकडून पाठिंबा देण्याची शक्यता असून, शरद पवार मुख्यमंत्री झाल्यास उपमुख्यमंत्रिपदाची माळ आदित्य ठाकरेंच्या गळ्यात पडू शकते.  महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही भाजपा आणि शिवसेनेने सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत ताठर भूमिका घेतल्याने राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. मतदानानंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांच्याकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही पुरेशा जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे 56 जागा जिंकणारी शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. बहुमत मिळाल्यानंतर भाजपाने सत्तेत समान वाटा देण्याबाबत नकारघंटा वाजवल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने सरकारस्थापनेबाबतचे इतर पर्याय चाचपून पाहण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी तसे सूचक संकेत दिले होते. राज्यात याआधीही विधिमंडळाची सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झालेली आहे. त्यापैकी कुणी राज्यसभेचे सदस्य होते. तर कुणी लोकसभेचे सदस्य होते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांबाबत नवी जुळवाजुळव होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019