शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:30 IST

भाजपच्या कोअर कमिटी आणि निवडणूक समितीची २३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

BJP Maharashtra Vidhan Sabha ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असल्याने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाची बोलणी सुरू असतानाच काही पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. भाजपच्या कोअर कमिटी आणि निवडणूक समितीची २३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून लवकरच ५० उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ आणि २४ सप्टेंबरला भाजपच्या प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक होईल. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि अन्य नेते उपस्थित असतील. या बैठकीमध्ये उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होईल आणि पितृपक्ष संपल्यानंतर ही यादी जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, भाजपकडून ५० उमेदवारांच्या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदारांसह कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीच्या गोटातही हालचाली

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही जागा वाटपाच्या चर्चेला बुधवारी सुरुवात केली आहे. तीनही पक्षांनी विभागवार आपले अहवाल बैठकीत मांडले. ही चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्येक विभागात सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. तसेच प्रत्येक मतदारसंघात तीन प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत यावर बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे, तसेच कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हा निकष समोर ठेवून जागा वाटप करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर उद्धव सेनेकडून नेते संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते.

  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMahayutiमहायुती