शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: काँग्रेसची बैठक संपली; महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 21:51 IST

काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत काही नावांबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.

Congress Candidate List ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. मात्र आज काँग्रेसच्या निवडणूक समितीची नवी दिल्ली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत महाराष्ट्रातील काही उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात ज्या जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे, त्या जागांवरील उमेदवारांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

नवी दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणूगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री पी.एल. पुनिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. बैठकीत काही नावांबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी

नागपूर       - विकास ठाकरे नांदेड         - वसंत चव्हाणलातूर         - शिवाजी काळगेनंदुरबार     - के.सी.पाडवी गडचिरोली - नामदेव उसेंडी कोल्हापूर  - शाहू महाराज छत्रपतीसोलापूर    - प्रणिती शिंदे पुणे           - रविंद्र धंगेकर अमरावती  - बळवंत वानखेडे

दरम्यान, या उमेदवारांबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नसली तरी कोणत्याही क्षणी आम्ही उमेदवारांची घोषणा करू,  असं के. सी. वेणूगोपाल यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४