शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:51 IST

आरोग्य योजनांच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

Maharashtra Government: राज्याचे आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आज शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. उपचाराअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागू नयेत यासाठी अपघातग्रस्त रुग्णांना विविध योजनांमध्ये अंगीकृत असलेल्या रुग्णालयांत १ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध करावेत, अशा सूचनाही आबिटकर यांनी दिल्या आहेत. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या आहेत.

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने पैशांअभावी गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात आरोग्य व्यवस्थेबाबत संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांना चाप बसवणे आणि राज्यातील जनतेला योग्य दरात आणि तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, याबाबत चर्चा करण्यासाठी आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांनी महिन्यातून एकदा आरोग्य शिबिराचं आयोजन करून किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत, यासाठी योग्य ती पावले उचला, असे निर्देश प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

दरम्यान, शासकीय आरोग्य योजनांतील सुधारणांसाठी एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीने पुढील एक महिन्यात आपला अहवाल सादर करावा, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Prakash abitkarप्रकाश आबिटकरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHealthआरोग्य