शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
4
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या
5
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
6
Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
7
Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरपासून गुरूचे अतिचारी भ्रमण; स्वामीकृपेने डिसेंबरपर्यंत शुभ काळ!
8
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
9
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
10
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
11
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
12
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
13
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
14
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
15
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
17
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
18
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
19
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
20
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी

मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नको; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:51 IST

मराठा समाज गरीब राहिला, तो बेरोजगार राहिला तर यांच्यामागे तो फिरत राहील आणि हेच या मोठ्या नेत्यांना हवे आहे. गरीब समाजाचे हित व्हावे यासाठी त्यांनी काहीच केले नाही.

कोल्हापूर : राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे ‘बॅकवर्ड’ असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे जगणे मुश्कील होत आहे, याची जाणीव त्यांना नाही. आपला समाज केवळ आपल्यामागे फरपटत यावा, अशीच यातील अनेकांची इच्छा आहे. गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मराठा समाज गरीब राहिला, तो बेरोजगार राहिला तर यांच्यामागे तो फिरत राहील आणि हेच या मोठ्या नेत्यांना हवे आहे. गरीब समाजाचे हित व्हावे यासाठी त्यांनी काहीच केले नाही. मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे, असे राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीला वाटत असेल, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १५०० कोटी रुपयांची मंजुरी द्यावी. मात्र असे काही न करता मराठा समाजाचे आंदोलन दडपून काढण्याच्या दृष्टीने १४४ कलम लागू करून आरक्षणाची चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.‘त्या’ नेत्याचे नाव सांगा; अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तरमुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असे वाटणाऱ्या नेत्याचे नाव सांगा. उगीच हवेत गोळीबार करून गैरसमज पसरवू नका, अशा शब्दांत मंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले.सध्या सर्व नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एकजूट होण्याची गरज आहे. सर्वांनी एकसुरात आरक्षणाचे समर्थन करायला हवे. मात्र चंद्रकांत पाटील सातत्याने गैरसमज पसरविणारी वक्तव्ये करून समाजात संभ्रम निर्माण करू पाहत आहेत. या आरक्षणाला कोणत्या नेत्याचा विरोध आहे, हे त्यांनी जगजाहीर करावे, असे आव्हान चव्हाण यांनी दिले.मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी, असा विनंती अर्ज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.मराठा समाजाच्या नेत्यांनी संयम बाळगावाअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहनपुणे : मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करू नये. मराठा नेत्यांनी थोडा संयम बाळगावा. अधिक गोंधळ झाल्यास राज्यातील आरक्षणही गमवायची वेळ येऊ शकते, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ओबीसी समाजाने मोठे मन करून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन राष्टÑवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. यावर ते म्हणाले, मी जे काही सोशल मीडियावर वाचतोय त्यावरून हेच दिसते की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे; मात्र आमच्या ताटातले नको, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठा नेत्यांनी पडू नये. महाराष्ट्रात जरी मराठा समाज १६ टक्के असला तरी देशात तो फक्त २ टक्के आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी एकत्र आले तर महाराष्ट्रापुरते मिळणारे आरक्षणही मिळणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या स्टे आॅर्डरने घाबरून जाऊ नये.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटीलAshok Chavanअशोक चव्हाण