आरटीओच्या शुल्कात मोठी वाढ
By Admin | Updated: January 7, 2017 00:54 IST2017-01-07T00:54:24+5:302017-01-07T00:54:24+5:30
केंद्र सरकारने मोटार-वाहन विभागातील विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे.

आरटीओच्या शुल्कात मोठी वाढ
पुणे : केंद्र सरकारने मोटार-वाहन विभागातील विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे. सुधारित शुल्क रचनेनुसार शिकाऊ परवान्यासाठी आता १५० रुपये मोजावे लागणार असून, स्मार्ट कार्ड नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्रासाठी २०० रुपये अतिरिक्त शुल्क असेल. याशिवाय इतर शुल्कांमध्येही वाढ करण्यात आली असून, २९ डिसेंबरपासून हे दर लागू करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.
मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करून विविध कामांसाठीच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारने २९ डिसेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ही शुल्कवाढ लागू होणार आहे. शिकाऊ, पक्का पक्क्या परवान्याबरोबरच आंतरराष्ट्रीय चालक परवाना, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, डुप्लिकेट परवाना, वाहनांचे फिटनेस शुल्क, पत्ता बदलणे, वाहनांचे पासिंग, ट्रेड सर्टिफिकेट अशा विविध शुल्कांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सर्व वाहनांच्या फिटनेस शुल्कामध्ये जवळपास ५० टक्के वाढ करण्यात आली आहे.
वाहन हस्तांतर शुल्कासाठी खासगी, प्रवासी व इतर प्रकारच्या वाहनांसाठी पूर्वी १० ते चारशे रुपये आकारले जात होते. आता हे शुल्क २५ ते २५०० रुपये असेल. वाहन नोंदणीसाठी पूर्वी विविध प्रकारच्या वाहनांसाठी २० ते ८०० रुपये आकारले जात होते. त्यात आता ५० ते ५ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. रहिवासी पत्त्यात बदल व मोटार वाहनातील फेरफार नोंदविण्यासाठी पूर्वी अनुक्रमे २० व ५० रुपये शुल्क आकारले जात होते. हे शुल्क वाहनांच्या प्रकारानुसार २५ ते अडीच हजार रुपये राहील.
दरम्यान, ही शुल्कवाढ करताना केंद्र सरकारने वाहतूकदारांशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही. अचानकपणे एकाधिकारशाही पद्धतीने शुल्क वाढविण्याचा निर्णय अयोग्य आहे. याविरोधात आंदोलन केले जाईल. त्यामुळे ही वाढ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने
केली आहे. (प्रतिनिधी)
>वाहन नोंदणी शुल्क
नवीन नोंदणी, नूतनीकरण जुनेनवीन
अपंगांसाठीचे वाहन२०५०
दुचाकी६०३००
तीनचाकी, हलके मोटारवाहन२००३००
>परवानाविषयक सुधारित शुल्क
जुने शुल्क नवीन शुल्क
शिकाऊ परवाना३११५०
शिकाऊ परवाना चाचणी/फेरचाचणी-५०
पक्का परवाना१००२००
आंतरराष्ट्रीय परवाना५००१०००
मोटार ड्रायव्हिंग स्कूल शुल्क२५००१०,०००
मोटार ड्रायव्हिंग स्कूल डुल्पिकेट परवाना२५००५०००
परवान्यातील पत्त्यात बदल करणे २०२००