राज्य सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक वाहनांना मिळणार लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 08:11 PM2020-09-15T20:11:51+5:302020-09-15T20:12:05+5:30

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षासाठी ही सवलत मिळणार आहे.

Big decision of state government; Commercial vehicles business will benefit | राज्य सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक वाहनांना मिळणार लाभ 

राज्य सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक वाहनांना मिळणार लाभ 

googlenewsNext
ठळक मुद्दे कोरोनामुळे निर्णय, वाहन करात सरकारची ५० टक्के सवलत

पुणे: राज्य सरकारने राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी एक दिलासा देणारी घोषणा केली आहे. या ६ निर्णयाचा फायदा सहा प्रकारच्या वाहनांना होणार आहे. त्यामध्ये मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, पर्यटक वाहने, खनिज वाहतूक, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कँपर्स वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश असणार आहे. 

कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्चपासून लागू केलेल्या टाळेबंदीचा विचार करून राज्य सरकारने राज्यातील प्रवासी वाहनांना वार्षिक वाहन करात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. ३१ मार्च २०२० ला मागील आर्थिक वर्षांचा पूर्ण वाहन कर जमा केला असेल त्यांना एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षासाठी ही सवलत मिळणार आहे.

२३ मार्च २०२० पासून पुढे सलग साडेचार महिने कमी-अधिक प्रमाणात टाळेबंदी होतीच. त्यामुळे वाहन करता किमान सहा महिन्यांची सवलत मिळावी अशी या व्यवसाय क्षेत्राची मागणी होती. उत्पन्न बंद असल्याने कर जमा करणे शक्य नाही असे त्यांचे म्हणणे होते. सरकारने त्याची दखल घेऊन त्यांना सहा महिन्यांचा कर माफ केला आहे. 

कोरोना काळात आधीच अडचणीत सापडलेल्या मालवाहतूक,प्रवासी वाहतूक, पर्यटक वाहने, खनिज वाहतूक, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कँपर्स वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. या वाहन मालकांनी त्यांचा एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या आर्थिक वर्षाचा संपुर्ण वाहन कर ३१ मार्च २०२० पर्यंत किंवा त्यापुर्वी सरकारजमा केलेला असला तरच त्यांना पुढील आर्थिक वर्षासाठी ही सवलत मिळणार आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Web Title: Big decision of state government; Commercial vehicles business will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.