शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठा निर्णय; सदस्यसंख्या वाढ रद्द, आरक्षण नव्याने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 06:12 IST

 उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने ११ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्णय घेऊन महापालिका, जिल्हा परिषदांमधील सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही संख्या जनगणनेच्या आधारेच नियमानुसार वाढवावी लागते. २०२१ ची जनगणना अद्याप झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील महापालिकांची वाढीव वॉर्ड संख्या, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची वाढीव गट/गणसंख्या रद्द करण्याचा आणि २०१७ प्रमाणेच ती कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही ठिकाणची आधी करण्यात आलेली प्रभाग/गट रचना रद्द होणार असून ती नव्याने करण्यात येणार आहे. 

 उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने ११ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्णय घेऊन महापालिका, जिल्हा परिषदांमधील सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही संख्या जनगणनेच्या आधारेच नियमानुसार वाढवावी लागते. २०२१ ची जनगणना अद्याप झालेली नाही. आधीच्या सरकारने लोकसंख्येत साडेचार टक्क्यांची वाढ गृहीत धरून प्रभाग/गट संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता; पण तो नियमानुसार नव्हता, अशी भूमिका घेत नवीन सरकारने तो रद्द केला आहे. त्यामुळे २०१७ मध्ये जेवढी सदस्य संख्या होती तीच कायम राहील. विधिमंडळाच्या अधिवेशनात याचे विधेयक आणून या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. तत्पूर्वी अध्यादेश काढला जाईल. महाविकास आघाडी सरकारने वाढीव सदस्यसंख्येच्या आधारे प्रभाग रचना केली व त्या आधारे आरक्षणदेखील जाहीर केले होते. तथापि, आता पूर्वीच्याच संख्येच्या आधारे प्रभाग रचना केली जाईल आणि आरक्षणही नव्याने काढावे लागेल. त्यामुळे अलीकडच्या प्रभाग रचनेत आरक्षणाचा फटका बसलेल्यांना आता नवीन रचनेत दिलासा मिळू शकतो.

निवडणुका लांबणीवर पडणार?मुंबईसह काही महापालिकांमध्ये दोन वेळा प्रभाग रचना करण्यात आली. आता तिसऱ्यांदा प्रभाग रचना होणार आहे. आरक्षणही नव्याने निघेल. जिल्हा परिषदांमध्येही नव्याने गटरचना, आरक्षण अशी प्रक्रिया राबवावी लागेल. याचा परिणाम म्हणून महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

महापालिकांमध्ये चारचा प्रभागमहापालिकांमध्ये तीनऐवजी चार वॉर्डांचा एक प्रभाग अशी रचना असेल. याबाबतचा वेगळा आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जि.प.ची सदस्यसंख्या कमीत कमी ५० असेल n जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. n सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ आणि जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या आहे. n ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील.

प्रभाग रचना नव्याने करावी लागेल२०१७ ची सदस्यसंख्या कायम ठेवल्याने त्यावेळचीच प्रभाग वा गटरचना कायम राहील, असा दावा काही राजकीय नेते करीत असले तरी गेल्या पाच वर्षांच्या काळात अनेक शहरांमध्ये काही भाग नव्याने जोडला गेला, हे लक्षात घेता ही रचना नव्याने करावी लागणार आहे. महापालिकांमधील अतिरिक्त आयुक्तांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMunicipal Election 2022महानगरपालिका निवडणुक 2022