शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृह विभागाचा मोठा निर्णय; भोंगे हटवण्याच्या हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 10:33 IST

बेकायदेशीर भोंगे हटवण्याबाबत गृह विभागाने सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावे असा इशारा दिला आहे. त्यासाठी सरकारने मौलवींशी चर्चा करावी असंही राज ठाकरेंनी सांगितले होते. त्यानंतर आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बेकायदेशीर भोंगे हटवण्याबाबत गृह विभागाने सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलीस महासंचालक बैठक घेणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांच्यातही बैठक होणार आहे.

सर्वधर्मीय सलोखा ठेवणे हा पोलिसांचा हेतू आहे. कुणालाही भोंगे अथवा स्पीकर लावायचे असतील तर त्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे असा निर्णय गृह खात्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस महासंचालकांच्या बैठकीला सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे. कायद्याचे पालन सर्वांसाठी आहे. त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही बैठक आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृह विभाग सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे.

तत्पूर्वी नाशिक पोलिसांनी भोंग्यांबाबत नोटीस जारी केले आहे. नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी आदेश जारी केले आहे. सर्व धार्मिकस्थळावरील भोंगे, स्पीकरची परवानगी घेणं बंधनकारक आहे. ३ मेनंतर बेकायदेशीर भोंगे हटवण्यात येतील. जर कुणाला हनुमान चालीसा पठण करायचं असेल तर ते मशिदीपासून १०० मीटर अंतरावर आणि दोन्ही एकाचवेळी वाजवू नये. अजानपूर्वी किंवा नंतर १५ मिनिटांनी हनुमान चालीसा लावली तरी हरकत नाही. कुणीही बेकायदेशीर भोंगे लावले तर ४ मेपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करून भोंगे जप्त करण्यात येतील. जो कोणी बेकायदेशीर भोंगे लावेल त्यांना ४ महिने ते १ वर्ष कारावास भोगावा लागू शकतो. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवावे अशी मागणी केली होती. त्यानंतर उत्तरसभेत यावर स्पष्टीकरण देताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केले जावे असं सांगत ३ मे पर्यंत भोंगे हटले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी त्याचा पुनरुच्चार केला. राज ठाकरे म्हणाले की, "देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ. त्यामुळे आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPoliceपोलिसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरे