Breaking: मोठी बातमी! महाराष्ट्रातील अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द; हायकोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 15:41 IST2024-03-26T15:40:59+5:302024-03-26T15:41:47+5:30
Akola West assembly by-election Update: देशातील एकूण २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. पैकी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे.

Breaking: मोठी बातमी! महाराष्ट्रातील अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द; हायकोर्टाचा निर्णय
लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.
देशातील एकूण २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. पैकी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे.
अकोलेकरांचा हक्काचा माणूस अशी ओळख असलेले माजी राज्यमंत्री तथा विधानसभेत सहा वेळा अकोल्याचे प्रतिनिधित्व केलेले आमदार गोवर्धन शर्मा यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ रिक्त होता. या जागेसाठी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यावेळी म्हणजेच २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार होते.
लोकसभा झाल्यानंतर लगेचच पावसाळा संपला की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे. यामुळे एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी असल्यामुळे हायकोर्टाने ही पोटनिवडणूक रद्द केली आहे.