शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 15:35 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील नाराज असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली असून, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील.

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार ३ मे ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील नाराज असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली असून, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील.

दिंडोरीमध्येभाजपाने विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी न देण्यात आल्याने तसेच पक्षाकडून निवडणूक प्रक्रियेत आपली फारशी दखल न घेतली गेल्याने हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज होते. अखेरीस या नाराजीचं रूपांतर बंडखोरीत झालं आहे. 

हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी विद्यमान खासदार भारती पवार यांचा २ लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. दरम्यान, २०१९ मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी १ लाख ९८ हजार ७७९ मतांनी विजय मिळवला होता. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४dindori-pcदिंडोरीHarishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाBharati pawarभारती पवार