कर्करोग रुग्णांसाठी बिग बींचा रॅम्प वॉक!

By Admin | Updated: March 1, 2017 02:21 IST2017-03-01T02:21:54+5:302017-03-01T02:21:54+5:30

कर्करोगग्रस्तांसाठी निधीची उभारणी करण्यासाठी ‘केअरिंग विथ स्टाईल’ या फॅशन शोचे आयोजन केले होते.

Big Bikes Rump Walk for Cancer patients! | कर्करोग रुग्णांसाठी बिग बींचा रॅम्प वॉक!

कर्करोग रुग्णांसाठी बिग बींचा रॅम्प वॉक!


मुंबई : कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (सीपीएए) आणि एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगग्रस्तांसाठी निधीची उभारणी करण्यासाठी ‘केअरिंग विथ स्टाईल’ या फॅशन शोचे आयोजन केले होते. या शोमध्ये शो स्टॉपर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट यांच्यासोबत रॅम्प वॉक केला.
बिग बी यांनी सीपीएएसाठी ११ लाख रुपयांचा निधीही दिला. या वेळी बिग बी म्हणाले की, परोपकारी सेवा संस्था या दानावर चालतात. त्यात आपल्याला जितके योगदान देता येईल, तितके देण्याचा प्रयत्न करत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त लहान मूल पाहणे फारच त्रासदायक आहे. अशा मुलांना आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने आणि आरोग्यदायी जगता यावे, म्हणून मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
या शोमधून उभा करण्यात आलेला निधी सीपीएएतर्फे मुलांच्या रक्ताच्या कर्करोगावर उपचारानिमित्त खर्च केला जाईल. फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांसह सध्याच्या चालू कलेक्शनमार्फत फॅशन डिझायनर शायना एन.सी. यांनी तयार केलेली डिझाइन या वेळी सादर करण्यात आली. या वेळी शायना एन.सी. म्हणाल्या की, या अनोख्या उपक्रमातून एकोपा आणि कठीण रोगाशी सामना करण्याची जिद्द प्रतित होते. अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाशी संलग्नित राहून कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. काही अंशी त्यात सफल होत असून या संस्थांसोबत काम करणे ही भाग्याची गोष्ट आहे. यापुढेही कर्करोगग्रस्त मुलांच्या जीवनात आशेचा किरण जागवण्याचा प्रयत्न सुरू राहील. (प्रतिनिधी)

Web Title: Big Bikes Rump Walk for Cancer patients!