बिबवेवाडीत अल्पवयींनाचा धुमाकूळ, १५ वाहने फोडली

By Admin | Updated: June 19, 2016 12:26 IST2016-06-19T12:15:05+5:302016-06-19T12:26:06+5:30

पुणे शहरातील दहशतीचे वातावरण संपणार कधी प्रश्न उपस्थित होत असून गेल्या काही दिवसात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत.

In Bibwewadi, the explosion of minors, 15 vehicles broke | बिबवेवाडीत अल्पवयींनाचा धुमाकूळ, १५ वाहने फोडली

बिबवेवाडीत अल्पवयींनाचा धुमाकूळ, १५ वाहने फोडली

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. १९ -  पुणे शहरातील दहशतीचे वातावरण संपणार कधी प्रश्न उपस्थित होत असून गेल्या काही दिवसात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना वाढल्या आहेत. बिबवेवाडीमध्ये अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने रविवारी पहाटे पुन्हा १५ ते २० वाहनांची तोडंफोड केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा दहशत माजली आहे. 
 
बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील व्हीआयटी महाविद्यालयाजवळ शनिवारी रात्री दोन गटात भांडणे झाली होती. यातील चार अल्पवयीन मुलांच्या टोळीने रविवारी पहाटे साडेतिनच्या सुमारास व्हीआयटी महाविद्यालयजवळील नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली. कोयते आणि दगड घालून हि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Web Title: In Bibwewadi, the explosion of minors, 15 vehicles broke