शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकाचे चार महिन्यांत भूमिपूजन

By admin | Updated: November 21, 2014 02:44 IST

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या चार महिन्यांत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. या स्मारकासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक परवानगी लवकरच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्रामचे विनायक मेटे, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले पाहिजे. यासाठी ज्या विभागांच्या मंजुरींची आवश्यकता आहे, त्या तातडीने आणि वेळेची मर्यादा पाळून पूर्ण केल्या पाहिजेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे या स्मारकाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करावा. त्याचबरोबर स्मारकाच्या निर्मितीसाठी सल्लागार निवडण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. जगात अशा प्रकारचे स्मारक ज्या कंपन्यांनी उभारले आहे, त्यांचे देखील मार्गदर्शन यासाठी घेण्यात यावे, या सर्व तांत्रिक बाबी येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण करून पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.जे. जे. स्कूल आॅफ आर्टने स्मारकाचे संकल्पचित्र तयार केले आहे. त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. हे स्मारक अरबी समुद्रातील भव्य अशा खडकावर उभारणार असून ते राजभवनापासून दीड किलोमीटर अंतरावर, तर मरीन ड्राईव्हपासून साडेतीन किलोमीटर आणि गेट वे आॅफ इंडियापासून साधारणत: १० ते १२ किलोमीटरवर असेल. (विशेष प्रतिनिधी)