शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

भुजबळांची २०.४१ कोटींची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 4:24 AM

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व इतरांवरील हवाला व्यवहारांच्या चौकशीत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवा आदेश जारी केला आहे.

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व इतरांवरील हवाला व्यवहारांच्या चौकशीत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवा आदेश जारी केला आहे. आजपर्यंत या प्रकरणांत एकूण १७८ कोटींची मालमत्ता जप्त झाली.दिल्लीतील महाराष्टÑ सदनाचे बांधकाम आणि मुंबईतील कलिना येथील एका जमीन व्यवहारात भुजबळ यांनी मिळविलेली कोट्यवधी रुपयांची लाच बोगस कंपन्यांच्या माध्यमातून अन्यत्र वळविली. या बेनामी मालमत्ता प्रकरणात गेल्या वर्षी भुजबळ यांना ईडीने अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. याच प्रकरणात भुजबळ यांचा मुलगा व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज आणि पुतण्या समीर हेदेखील आरोपी आहेत. भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मिळवलेली लाच इतरत्र वळवण्यासाठी कुटुंबीयांनी कट केला, असे ईडीचे म्हणणे आहे.याचिकेवर युक्तिवादसर्वोच्च न्यायालयाने प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) कायद्यातील कलम ४५ रद्द केल्याने भुजबळ यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज सादर केलेला आहे. या अर्जावर ईडीने आक्षेप घेतला. भुजबळांना सर्व संपत्तीचा हिशेब द्यावा लागेल, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत, आपल्या ताब्याची आवश्यकता आहे की नाही, हे जाणून आपला जामीन मंजूर करावा, अशी विनंती भुजबळांनी न्यायालयाला केली होती.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ