शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

भुजबळ-मुनगंटीवार यांच्यात जुंपली, सरकारने आर्थिक शिस्त बिघडविल्याचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:57 AM

तब्बल तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले.

नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. तब्बल तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले. भुजबळांच्या आरोपांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. उभय नेत्यांना आवरण्यासाठी इतर मंत्री व आमदारांना धावून जावे लागले.पुरवणी मागण्यांवरील चर्चेत छगन भुजबळ यांनी सरकारने राज्याची आर्थिक शिस्त बिघडविल्याचा गंभीर आरोप केला. अर्थसंकल्प सादर करून झाल्यावर तीन-चार महिन्यातच ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांची गरज का पडली, असा सवाल भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. नाशिक येथील वनहक्क जमीन पट्ट्याच्या मगणीसाठी आदिवासींनी भव्य मोर्चा काढला. त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले होते. तेव्हा त्यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु यावर काहीच झाले नाही. राज्यात ५० कोटी झाडे लावणे ही चांगली बाब आहे, पण तुमच्या वनविभागाचे अधिकारी झाडे लावण्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे आदिवासींची वनहक्काची प्रकरणे प्रलंबित आहेत. या भुजबळांच्या आरोपांवरून विधानसभेत ठिणगी पडली. यावर मुनगंटीवार संतापले. तेव्हा तालिका अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मध्यस्थी करीत नाशिकमधील अधिकाºयांकडे लोक जातात तेव्हा ते वृक्षारोपणात सध्या व्यस्त असल्याचे सांगत असल्याची बाब खरी असल्याचे निदर्शनास आणून दिली.वनपट्टे वाटप वनविभाग करीत नाही, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. लोकांचे जनरल नॉलेज बिघडवू नका, २००५ पासून हा प्रश्न आहे, तुम्ही काय केले तेही सांगा, असे मुनगंटीवार यांनी भुजबळांवर पलटवार केला. त्यावर तुम्ही काय दिवे लावत आहात? खोटेनाटे बोलून तुम्ही सत्तेवर आहात, असे भुजबळांनी मुनगंटीवारांना सुनावले. त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मुनगंटीवार एवढे संतापले की, त्यांचा आवाज फारच चढलेला होता. त्यामुळे शेजारील मंत्री आणि आमदारांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची समजूत काढली.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार