भुजबळांच्या एन्ट्रींने काका-पुतण्याचे स्वप्न भंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:15 AM2019-07-13T11:15:32+5:302019-07-13T11:23:18+5:30

प्रत्यक्षात भुजबळांनी जर वैजापूरमधून लढवण्याचे ठरवले तर, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना पक्षाकडून इतर मतदारसंघातून उमदेवारी मिळणे अशक्य आहे.

Bhujbal To fight assembly elections in vaijapur | भुजबळांच्या एन्ट्रींने काका-पुतण्याचे स्वप्न भंगणार

भुजबळांच्या एन्ट्रींने काका-पुतण्याचे स्वप्न भंगणार

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. तर येत्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व स्वता छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुंटुबातील सदस्यांनी करावे अशा मागणीचे निवेदन भारतीय समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भुजबळांना दिले. त्यामुळे मात्र वैजापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेले त्यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर यांची चिंता वाढली आहे.

येवला मतदारसंघात भुजबळांना आगामी विधानसभा अडचणीची जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर भुजबळ हे वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. वैजापूर मतदारसंघात राष्ट्रवादीची चांगली पकड आहे. तसेच तालुक्यातील ओबीसी मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामुळेच भुजबळांनी ह्या मतदारसंघाची निवड केली असावी. दुसरीकडे मात्र भुजबळांच्या एन्ट्रींने काका-पुतण्याचे स्वप्न भंगणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि त्यांचे पुतणे अभय चिकटगावकर यांनी आधीच पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र भुजबळ हे याच मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सूर झाल्याने काका-पुतण्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा काका-पुतण्याचे राजकीय युद्धाचे लोण आता औरंगाबादेत

प्रत्यक्षात भुजबळांनी जर वैजापूरमधून लढवण्याचे ठरवले तर, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना पक्षाकडून इतर मतदारसंघातून उमदेवारी मिळणे अशक्य आहे. दुसरीकडे भुजबळांना पक्षाने वैजापुरातून उमदेवारी दिली तर भाऊसाहेब चिकटगावकर नेमके काय निर्णय घेणार याची चर्चा त्यांच्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

Web Title: Bhujbal To fight assembly elections in vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.